जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट


मुंबईदि. 19 जर्मनीच्या शिष्टमंडळासाठी यंदा खास मराठी चित्रपटांची मेजवानी दिली जाणार आहे. जर्मनी आणि महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी पुढील वर्षभर वाईन फेस्टिवलफिल्म फेस्टिवल सह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जर्मनी दुतावासातील अधिकाऱ्यांनी सोमवारी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. जर्मनी दुतावासातील अधिकारी पार्वती वसंताअशुमी श्रॉफ यांच्यासह पर्यटन खात्याच्या सचिव विनिता सिंगलएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे या बैठकीला उपस्थित होते.
जर्मनीत भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत. बॉलिवूड टॉलीवूडसह यंदा फिल्म फेस्टिवल भरवून जर्मनीच्या पर्यटन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना मराठी चित्रपट दाखवावे अशी कल्पना पर्यटन मंत्र्यांकडून मांडण्यात आली. महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांच्या फिल्म्सचेही प्रमोशन करावे. फेब्रुवारी महिन्यात फिल्म फेस्टिवल घेण्याचा विचार करण्यात आला आहे. जर्मनीत भारतीय वाइन लोकप्रिय व्हावीमहाराष्ट्रातील वाइन व्यापार वाढावा यासाठी जुलै महिन्यात वाईन फेस्टिवल घ्यावाअशी सूचना जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी केली. या संयुक्त पर्यटन उपक्रमांमुळे महाराष्ट्र आणि जर्मनीत नव्या पर्यटन मैत्रीची सुरुवात होईलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.