सिकलसेल आजार नियंत्रण व जनजागृती रॅली



प्रशांत गेडाम/सिदेंवाही-
शहरात आज राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई जिल्हा परिषद चंद्रपुर तथा सर्वोदय युवा विकास संस्था चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामिण आरोग्य केंद्र सिंदेवाही यांच्या सौजन्याने 11 ते 17 डिसेंबर सिकल सेल सप्ताहाचे औचित्य साधून आज महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सिदेंवाही गावातुन सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे सिकलसेल आजारा विषयी जनजागृती होईल., व या आजारावर प्रतिबंध घालता येईल हा होता. यामध्ये रॅलीत सहभागी मा. सिंदेवाही नगराध्यक्ष सौ. मोहिनीताई गेडाम , वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुमरे ग्रामीण रुग्णालय , जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा पाहुणे, तालुका सिकलसेल पर्यवेक्षिका गिरडकर मॅडम, व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते .सदर कार्यक्रम महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय यातील शिक्षक वृंद तसेच महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्याने पार पाडले.