चंद्रपुर महाकाली कॉलरी येतील झरपट नदी वरून व रेल्वे पुलीया खालुन रस्ताचे मागनी मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांची मागनी।



चंद्रपुर महाकाली कॉलरी येतील झरपट नदी वरून व रेल्वे पुलीया खालुन  रस्ताचे मागनी मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांची मागनी।
महाकाली कॉलरी वार्ड येथुन वाहणारी झरपट नदी जी रेल्वे पुलिया खालुन वाहत असुन येथील रस्त्यावर पुलियाचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यावर दिवस भर येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या वाढत  असून या रस्त्यावरून येजा करणाऱ्याना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाकाली कॉलरीकडे जाणारे मुख्य मार्ग दोन असुन यावर बरेच वेडा रेल्वे गेट बंद असल्याने प्रवाशांना याच मार्गाने जावे लागते तसेच रात्री अपरात्री रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेला मार्ग काढण्याकरिता अर्धा तास थांबावे लागते. यात कोणताही जीवितहानी होऊ शकते.तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून महाकाली कॉलरी ते गौतम नगर वरून निघणारा महाकाली मंदिर रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांनी केली. तेव्हा मनसे चे जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ रामीडवार यांनी निवेदन देतांना रेल्वे प्रशासन आणि कलेक्टर साहेबाना जर 8 दिवसात कामाला सुरुवात नाही झाली तर मनसे स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा पण दिला. त्यावेडेस महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता गायकवाड, वाहतूक जिल्हा संघटक भरत गुप्ता,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे ,महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, महिला सचिव अर्चना आमटे, मनसे तालुका उपाध्यक्ष कृष्णा गुप्ता, शाहरुख अली, फिरोज शेख, सपना रेवेली, संगीता गोलेवार, आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते