आत्तापर्यंत भारत बंद केला पण असा 'बंद' नाही केला-उद्धव ठाकरे

आत्तापर्यंत भारत बंद केला पण असा 'बंद' नाही केला-उद्धव ठाकरे

सध्याचा बंद परवडणारा नाही, जनजीवन सुरळीत होईल पण थोडा वेळ लागणार

आत्तापर्यंत भारत बंद केला, मुंबई बंद केली. पण असा बंद आपण कधीही केला नाही. हा बंद आपल्याला परवडणार नाही. जे काही अंदाज आपल्यापुढे वर्तवण्यात आले होते ते थरकाप उडवणारे होते. तुमचा आणि माझा विश्वासाचा धागा मजबूत आहे तोपर्यंत मला काहीही चिंता नाही. करोनाच्या संकटाला आपण परतवून लावणारच हा मला विश्वास आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बंद ते बंद असं काहीही मला करायचं नाही. एक काळ होता मुंबई बंद करायचो, भारत बंद करायचो. मात्र सध्याचा हा बंद परवडणारा नाही” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आता आपल्याला जनजीवन रुळावर आणायचं आहे. आता आपल्याला जनजीवन सुरळीत करायची आहे. मात्र यासाठी काही काळ जाणार आहे. जेवढी लवकर या करोनाची साखळी तोडू तेवढ्या लवकर आपण यातून मुक्त होऊ. जे काही सरकार करतं आहे ते महाराष्ट्रातल्या माता-भगिनींना, लोकांच्या हितासाठी करतो आहे. आजपर्यंत जसं सरकारला सहकार्य केलं तसंच यापुढेही कराल अशी साखळी तोडून आपण बंधनमुक्त होऊ ही आशा बाळगतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे असंही ते म्हणाले आहेत. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दिनचर्या न्युज