ग्राम शुद्धी दिनानिमित्त संत नगाजी महाराज मंदिर परिसरात ग्राम सफाई अभियान

ग्राम शुद्धी दिनानिमित्त संत नगाजी महाराज मंदिर परिसरात ग्राम सफाई अभियान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर येथे दिनांक 15/5/ 2022 ला सकाळी सात वाजता नाभिक समाजाच्या संयुक्त संघटना मार्फत श्री संत नगाजी महाराज मंदिराच्या परिसरातील ग्राम शुद्धी दिनानिमित्त सफाई अभियान राबविण्यात आले.
व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. गुरुवर्य श्री संत मधुकर महाराज खोडे उर्फ खराटे महाराज यांचा जन्मदिवस अर्थात ग्रामशुद्धीदिनानिमित्य श्री संत नगाजी महाराज मंदिर परिसरात ग्रामसफाई मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली व सभा घेण्यात आली या अभियानात प्रेमज्योती बहुउद्देशीय नाभिक महिला मंडळ चंद्रपूर, अध्यक्षा ह. भ. प. सरोजताई चांदेकर, सौ. संध्याताई कडूकर, सौ रंजना राजूरकर,सौ. वनिता चल्लीरवार,सौ. संगीता चौधरी,सौ. कडवे, शालुताई चल्लीरवार,सौ.गंगा राजुरकर,सौ.प्रेमिला वाटकर सौ.,सिमा वनकर,छकुली राजुरकर, निसर्ग एकवनकर श्री संत नगाजी महाराज मंदिर कमिटीचे जेष्ट मार्गदर्शक श्यामदेव उरकुडे, वसंतराव बडवाईक, दत्तूभाऊ कडुकर, प्रकाश चांदेकर, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम राजूरकर,
तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर , संदेश चल्लीरवार ,पदाधिकारी उपस्थित होते.