ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांचा two taigar deth मृत्यू!

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांचा two  taigar deth मृत्यू!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दिनांक ०१/१२/२०२२
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर विभागातील शिवणी वनपरिक्षेत्रामधील वासेरा नियतक्षेत्रालगत असलेल्या महसूल विभागातील गट क्रमांक १८५ मध्ये बिट वनरक्षक वासेरा व बिट मदतनिस हे दिनांक ३०/११/२०२२ रोजी गस्त करीत असतांना त्यांना दुपारी ०३:०० वाजताच्या सुमारास वाघिण (T७५) मृत अवस्थेत आढळून आली. सदरहू बातमी कळताच श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) व डॉ.कुंदन पोडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच सदरहू घटनेचा मौका - स्थळ पंचनामा करण्यात आला. मृत वाघिणीचे अंदाजे वय १४-१५ वर्षे होते. सदरहू वाघिणीचा मृत्यू हा वयोवृध्द असल्यामुळे नैसर्गिकरित्या झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच मृत वाघिणीचे अंतर्गत अवयव व कातडी संपूर्णत: कुजलेल्या स्थितीत आढळून आली असून दात व नखे, ईत्यादी अवयव शाबूत स्थितीत आढळून आले. सदरहू प्रकरणी शिकार वा घातापाताचा प्रकार घडला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

दिनांक ०१/१२/२०२२ रोजी श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी, डॉ. सुरपाम, पशुवैदयकीय अधिकारी, पंचायत समिती, सिंदेवाही, श्री. बंडू धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, श्री. मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी, श्री. विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर जिल्हा यांनी घटनास्थळी भेट देवून मृत वाघिणीची पाहणी केली तसेच वैदयकीय तपासणी केली. त्यानंतर शवविच्छेदन करुन शवाचे दहन करण्यात आले. त्यानुसार घटनास्थळावर श्वान पथकाद्वारे तपास, पुढील निगराणी व ईतर आवश्यक कार्यवाही श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी शिवणी करीत आहे.

वाघाचे शावक (मादी )मृत अवस्थेत आढळली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी येथील कक्ष क्रमांक १८९ मध्ये अंदाजे ६-७ महिन्याचे वाघाचे शावक (मादी) दिनांक ०१ / १२ / २०२२ रोजी मृत अवस्थेत आढळून आले. सदरहू मादी शावक है T६० वाघिणीचे असल्याचे दिसून येते. सदरहू बातमी कळताच श्री. बापू येळे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली, डॉ. कुदन पौडचलवार, पशुवैदयकीय अधिकारी, डॉ. संजय चावणे, पशुवैदयकीय अधिकारी, श्री. बंडू धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, श्री. मुकेश भांदककर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देवून मृत वाघ शावकाची (मादी) पाहणी केली व मृत शाक्काला वैदयकीय तपासणी तसेच शवविच्छेदनासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे आणण्यात आले व डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे उपस्थितीत शवविच्छेदन करून आवश्यक नमूने तपासणी करीता घेण्यात आले. सदरहू शावकाचा मृत्यू ईतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यानुसार घटनास्थळावर पुढील निगराणी व ईतर आवश्यक कार्यवाही श्री. कुशाग्र पाठक, उपरांचालक (बफर) यांचे मार्गदर्शनात श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली करीत आहे.