भिकाऱ्यांना पैसा ऐवजी अन्न पाणी द्या !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्यसह देशात लहान मुलांचे अपहरण करून त्यांना अवैध्य मार्गाने लावण्याचे प्रकार सुरू असल्याची बाब चर्चिला जात आहे. त्यातून काही राज्यात, शहरात मोठमोठ्या 'भिकारी' या गटाच्या टोळ्या निर्माण करण्यात येत असून यात बाल वयातील मुलांना त्याचे अपहरण करून या मार्गात लावल्या जातात. एवढेच नाही तर शहरातील अनेक भागात महिला पेट्रोल पंप, वर्दळीचे ठिकाण, मंदिर या ठिकाणी लहान मुलांना घेऊन महिला भिकेच्या स्वरूपात पैशाची मागणी करतात. याचा परिणाम भविष्यात त्यांच्याजवळ असलेल्या लहान बालकावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण होऊन ते भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करतील असे नाकारता येत नाही.
असाच प्रकार चंद्रपूर शहरातील अनेक पेट्रोल पंप, वरदळी चे ठिकाण, प्रशासकीय कार्यालय याच्या आजूबाजूला महिला लहान मुलांना घेऊन भीक मागताना दिसतात. आपण या भीक मागणाऱ्या महिलांना एक रुपयाही कॅश न देता अन्न पाणी देऊ पण पैसा देणार नाही. अशी खबरदारी जर नागरिकांनी घेतलीस तर भविष्यात मुलांचे अपहरण, लहान बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे, पाकिट मारणे, चोरी करणे, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे
प्रकार भविष्यात घडणार नाही .
आजपासून CASH भीक देणं बंद भिकाऱ्यांना ( अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो. आणि ही चळवळ योग्यच आहे. कोणत्याही प्रकारची (महिला / पुरुष / वृद्ध | अपंग मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी ( अन्न + पाणी ) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर शहरातील 'भिकारी' या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल. सुरवात करा एक हि रुपया भिकाऱ्याला देऊ नका.. खूप वाटल तर गाडीत 2 बिस्कीट चे पुडे ठेवा पण पैसे देऊ नका !