महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात दोघांचा मृत्यू , दोन गंभीर जखमी
दिनचर्या न्युज :-
आर्णी (यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय
महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
महामार्ग पोलिसांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी आहेत.
शनिवारी रात्री १: ३० गस्तीवर असताना, कोसदनी घाटाजवळ एका आयशर ट्रकने महामार्ग पोलिसाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात पोलिस शिपाई संजय रंगराव नेटके (४१) व ट्रक चालक पांडुरंग हरी नकाते (५०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहेत.
महामार्ग पोलिसांच्या वाहनाला धडक, दोघांचा मृत्यू
ट्रकने दिलेल्या धडकेत २ पोलिसांचा मृत्यू झाला असून इतर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.