26 जानेवारीला आयोजित संविधान सन्मान बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे




26 जानेवारीला आयोजित संविधान सन्मान बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

बळीराज धोटे व अँड फरहाद बेग संविधान सन्मान बाईक रॅली आयोजीत समीती.

दिनचर्या न्यूज :-
चंद्रपूर :-
भारतीय संविधान सभेने २६ नोव्हे १९४९ ला मंजुर केले मात्र भारतीय संविधानाचा
प्रत्यक्ष अंमल २६ जाने १९५० ला सुरू झाला. त्यामुळे भारतात हजारो वर्षे जातीच्या
आधारावर नागरीकांमध्ये भेद करण्याची व व्यक्तीला व्यवसाय, जात आणि लिंगावरून श्रेष्ठ
कणिष्ठ माणुन भेदाभेदी व्यवहार करणे कायदयाने गुन्हा ठरले. त्यामुळे भारतीय संविधानाचा
प्रत्यक्ष अंमल होणारा दिवस म्हणजे २६ जाने १९५० हा दिवस भारतीयांसाठी खरा मानवमुक्ती दिन आहे.
RSS च्या विचाराने प्रभावीत लोक सध्या केंद्र व राज्य सरकारात सत्तेवर आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढयात कोणताही सहभाग न घेणारी उलट इंग्रज सरकारचे समर्थन करणारी मंडळी संविधानाच्या न्याय स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता तत्वाला विरोध करून भारताच्या अखंडतेला पुन्हा धोरण निर्माण करू पाहात आहे. म्हणुन सर्व सामान्य नागरीक व खास करून तरूनांमध्ये भारतीय संविधान लोकशाही धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य समता बंधुत्वाची मुल्ये अधिक रूजावी यासाठी आज २६ जाने २०२४ ला चंद्रपुरात स. १० वाजता गांधी चौक चंद्रपुर पासुन संविधान सन्मान बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. या संविधान सन्मान बाईक रॅलीमध्ये नागरीकांनी त्यातही तरूणांनी मोठया संख्येने सहभागी होउन संविधाना प्रती व संविधान निर्मात्या प्रती आदर व्यक्त करून, लोकशाही मुल्ये नागरीकात रूजविण्याच्या उपक्रमाला साथ दयावी. असे आवाहन पत्रकार परिषदे मध्ये संविधान सन्मान बाईक रॅली आयोजक सतीतीचे समन्वयक बळीराज घोटे व अॅड फरहाद बेग यांनी केले.
२६ जानेवारी हा भारतीय नागरीकांसाठी खरा मानव मुक्ती दिन असल्याने सर्वांनी आपल्या घरावर दिवे लावावे. रोषनाई करावी असे आवाहन बळीराज घोटे व अॅड फरहाद बेग
यानी कले संविधान सन्मान बाईक रॅली २६ जाने ला सकाळी १० वा गांधी चौकातुन निघेल.
रॅलीमध्ये संविधन सन्मानार्थ घोषणा देण्यात येतील. रॅली अतिशय सिस्तबध्द रितीने निघेल. रॅलीत सहभागी होणारे कार्यकर्ते आपल्या बाईक ला राष्ट्रध्वज बांधून सहभागी होतील.
रॅली गांधी चौक जटपुरा गेट रामनगर मार्गे जुना वरोरा नाका चौक नागपुर रोड मार्गे गजानन मंदिर चौक, परत जुना वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावरून तुकुम एट.टी स्टॅस्ड चौक, मातोश्री विद्यालया, पासुन गुरूद्वारा रोड, तुकुम ने आदर्श पेट्रोल पंम्प, मार्गे बंगाली कॅम्प, मुल रोड ने MEL चौका पासुन परत बंगाली कॅम्प रामनगर पो.स्टे बस स्टॅन्ड, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड ने कस्तुरबा चौक, अंचलेश्वर गेट, बागला चौक, परत शिवाजी चौकातुन भानापेठ मार्गे जुना पोस्ट ऑफीस चौक, कस्तुरबा रोड जेल रोड मार्गे जोळदेऊळ चौक मार्गे मेन रोड ने गांधी चौकात समारोप होईल.
म्हणून उद्या होणाऱ्या सविधान सन्मान बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बडराज धोटेव एडवोकेट फरहाद बेग, सूर्यकांत खनके, यास अनेक आयोजित समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून केले.