स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक मोठी कारवाई
आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले. दिनांक 28/08/24 रोजी स्था. गु. शा. चंद्रपूर ने पो. स्टे. रामनगर अप क्र. 834/24 कलम
4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार जप्त केले.
आरोपीचे नाव राहुल उर्फ अजय गिरिधर मादणकर वय 22 रा. राजीव गांधी वार्ड, रयतवारी ,चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर असे असून त्याचे कडून एक नग लोखंडी धारदार व टोकदार तलवार कि. 500/- जप्त करण्यात आले आहे.
वर नमूद ताब्यातील आरोपीस व मुद्देमाल पुढील तपासकामी पो. स्टे. रामनगर चे ताब्यात देण्यात आले.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भूरले , नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल घारघाटे सर्व स्था. गु. शा. चंद्रपूर पथकाने केली.