किशोर जोरगेवारांची महा रॅली विजयाचा शंखनाद देणारी ठरेल ..!!
जंगी प्रदर्शन जोरगेवारांच घोषणा दादांच्या....!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जंगी प्रदर्शन करत . महा रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला.
भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
यावेळी निघालेल्या रॅलीचे विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.
विजयाची शंखनांद देणारी महा रॅली पाहून विरोधकाची अर्धी हवा निघाल्याची आत्ताच शहरात चर्चा होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांनी 'याची डोळा , प्रत्यक्ष रॅलीतील जनसमुदाय बघितला .
सर्वधर्मीयांच्या वतीने ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. दुपारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून सदर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महायुतीतील हजारो कार्यकर्ते आणि जोरगेवार समर्थक सहभागी झाले होते.
सदर भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे करू शकलो असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांनाही प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. सुरू झालेला हा विकासपर्व अधिक गतीशील करायचा आहे, यासाठी आपली साथ आणि आशीर्वाद असाच राहावा, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.
यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या रॅलीच्या ठिकाणी आलेल्या काही भाजप कार्यकर्त्याच्या मनात शरीर एकाकडे आणि मन दुसरीकडे अशा प्रकारचे अविचलित करणारे दृश्य पाहायला मिळाले.
महा रॅली ही भाजप कडून निवडणूक लढणाऱ्या किशोर जोरगेवारांची असताना सुद्धा त्या ठिकाणी दादांच्या विजयाच्या घोषणा देणे सुरू होते. म्हणजे यावरून दोन्ही पक्षांतर्गत गटात संभ्रम निर्माण करणारे दृश्य दिसून येत होते. आणि तशी चर्चा पण होती !?