प्रस्थापित, वर्धा नदीच्या शिवनीचोर रेती घाटातून रात्रोला तस्करी ! महसूल विभागाची मूक सहमती!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील लगत असलेल्या वर्धा नदीच्या शिवनी चोर या रेती घाटातून रोज रात्रोला दहा ते बारा ट्रॅक्टर द्वारे रेती तस्कराकडून रेतीची उचल केली जाते. ती रेती अज्ञात ठिकाणी साठवून ठेवून हाफ टन किंवा हायवा द्वारे अवैद्य रित्या शासनाचा महसूल बुडवून बे भाव दराने विक्री केल्या जाते. सदर रेती घाट हा शासनाकडून प्रस्थापित असून या रेती घाटाच्या लिलावासाठी शिवनीचोर ग्रामपंचायत ने ठराव सुद्धा घेऊन तहसीलदाराकडे प्रस्तावित लिलावासाठी पाठविला असल्याची विश्वसनीय माहिती असली तरी. शासनाच्या खनिक कर्ण विभागाच्या आशीर्वादाने या प्रस्थापित रेती घाटाचा लिलाव होण्याअगोदरच रोज
रात्रोला अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना आणि लाखोचा महसूल शासनाचा बुडत असताना सुद्धा याकडे मात्र महसूल विभाग उघड्या डोळ्याने पहात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जेव्हा केव्हा या रेती घाटाचा लीलाव होईल तोपर्यंत या रेती घाटातील रेतीचा सर्व उपसा होण्याचे चित्र दिसत असून या ठिकाणी होत असलेली रेतीची तस्करी त्वरित थांबवावी जेणेकरून शासन प्रशासनाला या रेती घाटाचा महसूल प्राप्त होईल. आणि अवैद्यरित्या होत असलेल्या रेतीची चोरीला फार मोठ्या प्रमाणात आळा बसेल .
शासनाच्या अजब धोरणामुळे एकीकडे घरकुल धारकांना रेती साठी बे भाव दराने शासनाचा महसूल बडवलेली चोरीची रेती तस्कराकडून खरेदी करावी लागत आहे.
आणि दुसरीकडे प्रस्थापित रेती घाटातून महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ फेकून सर्रास रोज रात्री रेतीची तस्करी खुलेआम होत आहे. यावर आळा बसवून संबंधित रेती घाटाला शासन नियमानुसार लिलाव करून द्यावा. अशी मागणी आता होत आहे.