झेडपीच्या ..या विभागातील 'फाल्गुनी' बेरोजगारांना लावला लाखोचा चुना !



झेडपीच्या ..या विभागातील 'फाल्गुनी' बेरोजगारांना लावला लाखोचा चुना !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कंत्राटदाराकडून नोकर भरती होत असल्याचे भासवून चंद्रपुरात सध्या बेरोजगार युवकांकडून आर्थिक व्यवहार करून फसवणुकीचे दलाल सक्रिय झाले आहेत. तसाच प्रकार चंद्रपूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी 'फाल्गुन' यांनी सात आठ बेरोजगार युवकाकडून शासकीय रुग्णालयात वार्ड बाय, सफाई कामगार, सेक्युरिटी साठी नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयाची फसवणूक केल्याचा चर्चा फार जोर धरत आहे.
मागील दोन महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कंत्राटदाराकडून सेक्युरिटी साठी बेरोजगाराकडून भरती सुरू असल्याची सांगून अनेक युवकाकडून  दलालानी  आर्थिक व्यवहार करून  युवकांची फसवणूक केली आहे. 
सुत्राच्या माहिती नुसार बनावटी नियुक्ति प्रमाणपत्र देण्यात आले . 
 यासाठी चंद्रपूर शहरात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. असाच एक दलाल कुणाच्यातरी आका हा  जिल्हा परिषद कार्यरत असलेल्या  या फाल्गुन ने  बेरोजगाराकडून  लाखो रुपयाने गंडवले 
असल्याचा प्रकार सामोरे येत आहे.
 संबंधित 'फाल्गुन' ला याबाबत विचारपूस केली असता भारत ....  नावाच्या व्यक्तीकडे पैसे दिल्याचे सांगतो आहे. ...संबंधिताचे पैसे मी  नौकरीच्या नावावर 
घेतल्याचे सांगितले. 
ते लोन काढून भरून देण्याची  ग्वाही(हमी) त्यांनी माध्यम प्रतिनिधीं समोर दिली. मुळातच या कर्मचाऱ्याला   संबंधित बेरोजगार युवकाकडून लाखो रुपये घेण्याची जरुरत का पडली? याच्यावर बेरोजगार युवकाकडून फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल का होऊ नये? असे विविध प्रश्न आता पडू लागले आहेत. या फाल्गुन ला जिल्हा परिषद मध्ये सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष बाकी आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्याने प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.  अशा कर्मचाऱ्यामुळे जिल्हा परिषद  बदनाम  होत आहे .याचेवर    बडतर्फीची कारवाई का करण्यात येऊ नये.अशी मागणी होत आहे.