भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष आ. किशोर जोरगेवारांच्या कार्यालयात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे जिल्ह्यातील व शहरातील मंडळअध्यक्ष निवडीचे मुहूर्त निघण्यास पक्षांतर्गत वेळ लागला होता. मात्र
आज चंद्रपूर शहरातील भाजपच्या शहराध्यक्षपदी तळ्यात आणि मळ्यात असलेले माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांची वर्णी लागली. अध्यक्षपद मिळताच सर्वप्रथम ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. आणि ते अध्यक्षपद जोरगेवार यांच्या समर्थनामुळेच शक्य झाल्याचे दिसून आले. त्यांचा आशीर्वाद हा कासनगोटूवारांना मिळाला. मात्र या नव्या अध्यक्षाच्या निवडीमुळे भावी नगरसेवकांची सपने पाहणाऱ्यांची गोची झाली.
जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत गटबाजी व गृहकलामुळे मंडळ अध्यक्षाच्या निवडीला मुहूर्त निघत नव्हता अखेर त्याच्यावर आता किशोर जोरगेवार समर्थक असलेले सुभाष कासनगोट्टूवार यांच्या रूपाने शहराध्यक्ष पदाचा पडदा पडला.
यापूर्वीही या सुभाष कासनगोटूवार यांनी अध्यक्षपद मिळावे म्हणून दावेदारी केली होती. परंतु ती दावेदारी पदरी पडली नाही. त्यांच्या ऐवजी भाजपच्याशहराचे अध्यक्ष म्हणून राहुल पावडे यांना बहाल करण्यात आली होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष निवडीचा मुद्दा हा प्रदेश कार्यकारणी पर्यंत पोहोचला होता. लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री शोभा फडणवीस, किशोर जोरगेवार यांचा गट सक्रिय झाला होता. एवढेच नाही तर चिमूर चे आमदार बंटी भांगडिया यांच्यासोबत मुनगंटीवार्याचे शौख्य नसल्याने सुभाष कासमगोटूवार भांगडियाच्या जास्त जवळीक झाले होते.
आता शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका समोर येत आहेत. या निवडणुकीसाठी हौसे गवसे भाजपच्या उमेदवारीसाठी दावे करणार आहेत. मात्र या नवीन अध्यक्षाच्या निवडीमुळे अनेक भावी नगरसेवकांची गोची होईल की काय? की पक्षांतर्गत भावी नगरसेवकासाठीही गटबाजीचे तर होणार नाहीत ना! ही येणारी वेळ सांगेल!