फुटपाथवर अतिक्रमण, निष्पाप मुलीचा नाहक बळी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरातील तुकुम परिसरात एका अनियंत्रित हायवा ट्रक चालकाने एका निष्पाप मुलीचा नाहक बळी घेतला. त्यात दोन मुली गंभीर जखमी झाल्या. मुख्य रस्त्यावरील फुटपाथ वर असलेले अतिक्रमाची भर पडली आहे.
शहरात वाहतूक जास्त झाली आहे. रस्त्यावर अतिक्रमणात दोन्ही बाजूला हात ठेले, गाड्या पार्किंग, मध्येच कुठेतरी ऑटोचे स्टॅन्ड, वाटेल त्या ठिकाणी ऑटो वाल्यांना प्रवासी दिसल्यास लगेच ऑटो मागेपुढे न पाहता थांबवणे. त्यात पुन्हा संडे मार्केटची रस्त्यावरची दुकानदाराची भीड या संदर्भात समाजसेवक राजेश विराणी यांनी अनेकदा सोशल मीडियावर फोटोसह माहिती देण्याचा प्रशासनाला प्रयत्न केला. परंतु प्रशासन कुठेही गंभीरतेने घेतलेला दिसले नाही. त्यामुळेच दोन दिवसा अगोदर झालेल्या फूटपाथवरच्या अतिक्रमांमुळे निष्पाप मुलीचा बळी गेला. चंद्रपूर शहरातील महानगरपालिका, वाहतूक शाखा विभाग, आणि आरटीओ यांच्या आशीर्वादामुळे मुख्य रस्त्यावर ट्रॅव्हल्स, आजही उभ्या राहतात. फुटपाथ वाल्यावर कारवाई करण्यास मनपा अतिक्रमण दस्तक पोहोचल्यास लगेच राजकीय हस्तक्षेप होत असल्याने त्यांनाही नाईलाजाने मागास तर परतावे लागते. मग अशा घटना झाल्यास जबाबदार कोण?
वाहन चालकाच्या उप प्रादेशिक कार्यालयाकडून सहा महिन्यात त्यांचं आरोग्याची तपासणी का केल्या जात नाही. अशा वाहन चालकाकडून निष्पाप नागरिकाचा बळी जातो. त्या परिवारावर काय भितत असेल त्या ठिकाणी आपलाही एखादा बळी जाऊ शकतो.
त्या 22 वर्षीय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलीचा
अपघातात मृत्यू झाला. चंद्रपूर मनपाच्या वतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची सुरुवात झाली.
असे अतिक्रमण शहरातील मुख्य रस्त्यावर हटतील का?
मुख्य रस्त्यावर जयंत टॉकीज रोड, रेड क्रॉस ची रोडची गल्ली, शासकीय रुग्णालया समोर
जुबली शाळेसमोर, रघुवंशी कॉम्प्लेक्स, गोकुळ गल्ली ,गोल बाजार, कस्तुरबा रोड बँक ऑफ इंडिया जटपुरा गेट लगत असलेल्या फुटपाथवर फुल विक्रेत्यांची गर्दी, या ठिकाणीही अतिक्रमाचा विळखा सतत असतो.
हे सर्व फूटपाथ वरील अतिक्रमण आणि शहरातील संडे मार्केट वाल्यांना ट्राफिकची आता यात निर्माण न होणाऱ्या ठिकाणी जागा देण्यात यावी. अशी मागणी समाजसेवक एड.राजेश विराणी यांनी केली असून याकडे चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.