ढिवर-भोई-केवट समाजाचा उप वधू-वर परिचय मेळावा


नागभीड येथे समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात साजरा

चिमूर /रोहित रामटेके
दिनांक 13/01/2019 रोजी नागभीड येथील फ्रेंड्स कॉलोनी च्या मैदानात ढिवर,भोई,केवट समाजाचा उप वधू वर परिचय मेळावा पार पडला.

या मेळाव्याला उदघाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर चे अध्यक्ष मा.कृष्णाजी नागपुरे साहेब लाभले होते तर अध्यक्ष स्थानी मा.दिनानाथजी वाघमारे संघर्ष वहिनी नागपूर हे होते..!! तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. राजेशजी डहारे,डॉ.दिलीपजी शिवरकर,प्रा.के.एन. नान्हे सर,मा.प्रकाशजी नान्हे सर,श्री.गजेंद्र दि चाचरकर, सौ.किर्तीताई भानारकर हे होते..!!

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक,अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक यांनी शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर मार्गदर्शन केलं..!!

यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगीरी करणाऱ्या समाजभूषणांचा सत्कार करण्यात आला... यात चंद्रपूर जि.मध्य.बँकेचे उपाध्यक्ष यशवंतजी दिघोरे, चंद्रपूर जि.भोई सेवा समाज संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.कृष्णाजी नागपुरे सर,संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ. राजेशजी डहारे, मा.रमेशजी नागपुरे, चंद्रपूर जिल्हा मच्छिमारी संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल मा.दामोदरजी रुयारकर, मा.विजयजी नान्हे, पंचायत समिती नागभीड च्या सदस्या सौ.सुषमाताई खामदेवे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करणयात आला..!!

या कार्यक्रमाला राजू डाहारे बोथली, प्रकाश पचारे पौनी, वाघधरे सर, चाचरकर सर शंकरपूर, यादव मेश्राम सरपंच पेंढरी, पुंडलीक राव मांढरे चिमूर, डॉ हिरालाल मेश्राम ब्रह्मपुरी, महादेव वाघमारे भिवापूर, कीर्तनकार भुरे महाराज, युवराज भाऊ नागपुरे, सुरेश रामबाण शिवरकर नागपूर यांनी सुद्धा विशेष उपस्थिती दर्शविली.

यावेळी अनेक उपवर वधूवरांनी परिचय दिला.. कार्यक्रमाच्या सुरवातीला मेळाव्याचे रंगरुप आले या नगरा या स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.. विविध कोळी नृत्य सादर करून समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले....!!

या कार्यक्रमासाठी महर्षी वाल्मिकी यांची रांगोळी उत्तम रेखाटन केल्याबद्दल रंगोळीकर विवेक गोहणे व सचिन फटींग यांचा समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला...!!

या कार्यक्रमासाठी नागभीड,चिमूर,ब्रम्हपुरी,सिंदेवाही तालुक्यातून हजारो बांधव उपस्थित झाले होते..!!

या कार्यक्रमचे नियोजन व आयोजन भोई,ढिवर,केवट समाज सेवा संघ नागभीड अध्यक्ष गुलाबरावजी भानारकर, कार्याध्यक्ष नागोजी नान्हे उपाध्यक्ष मधुकर डहारे,सचिव गिरीधर नगरे,सह सचिव नीलकंठ चांदेकर सर,सहसचिव शांतारामजी नागपुरे सर,सहसचिव मोरेश्वर शेंडे सर,कोषाध्यक्ष अरुणजी दिघोरे,सल्लागार प्रमोदजी नान्हे,तालुका प्रतिनिधी होमदेव नान्हे सर, सदस्य गजानन मांढरे,दयाराम नान्हे,हिवराज दिघोरे,प्रभुजी वाघधरे,विलास दिघोरे,दिलीप भानारकर, तसेच वाल्मिकी बचत गटाचे सर्व सदस्य व गंगोत्री महिला बचत गटाच्या सर्व महिला,व संघाच्या महिला कार्यकारणी यांनी केले..!!

या कार्यक्रमा च्या आयोजन साठी भिसी येथील जोड मारुती देवस्थान गाव तलाव भिसी च्या टिम ने आपल्या परीने प्रयत्न केले. भिसी येथील गजेंद्र दि चाचरकर, रामचंद्र दिघोरे, आनंद हरी भानारकर, लक्ष्मण चाचरकर, शिवदास दिघोरे, वसंता शिवरकर, रोशन मोहिणकर, नेहरू खेडकर, हरीचंद्र नागपुरे आणि इतर तसेच चिमूर येथून बालाजी मोहिणकर यांनी सुद्धा मेहनत घेतली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले तर वधू वर परिचय मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ.कीर्ती भानारकर यांनी केले,प्रास्ताविक गिरीधरजी नगरे यांनी केले..!