चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर/रोहित रामटेके:

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५,शके १६७६ ला झाला, त्यांनी अश्विन वद्य २,शके १७६६ ला पारडी येथे समाधी घेतली, त्या प्रित्यर्थ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूर चे वतीने मागील दोन दशकापासून अविरत सुरू आहे, याही वर्षी २१ वे वर्ष असून रविवार दि २ ते मंगळवार दि ४ डिसेंम्बर २०१८ ला श्री संत नगाजी महाराज मंदिर (पावसी आंबा)चिमूर येथे विविध कार्यक्रमाने संपन्न होत आहे .
         दरम्यान दिवाकर पुंड यांचे हस्ते 'श्री'ची घटस्थापना तसेच हभप धर्माजी बारसागडे महाराज, नीलकंठ जमदाडे महाराज पिंपळनेरी,चन्ने महाराज, पांडुरंग जुनारकर महाराज घुग्गुस, यांचे कीर्तन ,महाराजांची शोभायात्रा, महिलांची रांगोळी स्पर्धा, तसेच समाजातील वैचारिक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, या होणाऱ्या कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष देवेंद्र कडवे, सचिव अरुण चिंचुलकर तथा समस्त सदस्य गणांनी केली आहे .