गोंडराजे समाधिस्थळी ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनी

  • जागतिक ऐतिहासिक वारसा सप्ताह निमित्त छायाचित्र प्रदर्शनी चे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन
  • पुरातत्व विभाग, इको-प्रो च्या सहकार्याने विविध स्पर्धाचे आयोजन

चंद्रपूर: जागतिक ऐतिहासिक वारसा सप्ताह निमित्त आज गोंडराजे समाधिस्थळ या ऐतिहासिक स्थळी ऐतिहासिक वास्तु छायाचित्र प्रदर्शनी चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांचे हस्ते करण्यात आले.
आज पुरातत्व विभाग तर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनी व विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक डॉ कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी, डॉ इजहार हाशमी, अधीक्षक पुरातत्वविद, बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो, आचार्य टी टी जुलमे, इतिहास अभ्यासक, सौ पोटदुखे, प्राचार्य, खालसा स्कूल, डॉ शिल्पा जामगडे, सहायक पुरातत्वविद आदि उपस्थित होते.
चंद्रपुर येथील ऐतिहासिक गोंड़कालीन किल्ला हा 550 वर्ष प्राचीन असून त्याची स्वच्छता मागील 570 दिवसांपासून इको-प्रो संस्था करित आहे. त्याची दखल खुद्द मा. पंतप्रधान यांनी "मन की बात" मधे घेतली आहे. पुरातत्व विभाग ने सुद्धा 24 सप्टे 2018 ला इको-प्रो सोबत एक 'करार' करित शहरातील ऐतिहासिक वास्तु 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'दत्तक' दिलेले आहे. बल्लारपुर नगर परिषद सोबत सुद्धा पर्यटन सुविधा विकसित करण्यासंदर्भात करार झालेला आहे असे दोन करार झालेला चंद्रपुर जिल्ह्या देशात एकमेव आहे.
प्रदर्शनी मधे भारतातील, एशिया-पेसिफिक मधील विश्वदाय ऐतिहासिक स्मारक स्थळ विषयी महितीसह छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आलेले आहे. तसेच विदर्भातील ऐतिहासिक स्मारक, शहरातील स्मारकांची महितीसह छायाचित्र लावण्यात आलेले आहे. चंद्रपुर किल्ला स्वच्छता अभियान ची छायाचित्र सुद्धा लावण्यात आलेली आहेत. यावेळी सहभागी विविध शाळेत विद्यार्थ्यां मधे सांस्कृतिक जागृतती व्हावी याकरिता निबंध, चित्रकला आणि 'ऐतिहासिक स्मारक ज्ञान स्पर्धा' घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना भारत पुरातत्व विभाग तर्फे तयार करण्यात आलेल्या फ़िल्म चे सादरिकरण करण्यात आले.
यावेळी विदयार्थाना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी खेमणार म्हणाले की, आपला इतिहास वस्तुच्या स्वरुपात जीवंत असतो, तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभाग सोबत सर्व नागरिक आणि आपल्या सारख्या विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. चंद्रपुर ऐतिहासिक शहर असून सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत शिंदे वरिष्ठ संरक्षण सहायक, रविंद्र गुरनुले, इको-प्रो पुरातत्व विभाग, शाहिद अख्तर, संरक्षण सहायक, चंद्रकांत भानारकर, वरिष्ठ छायाचित्रकार, इको-प्रो चे सदस्य नितिन रामटेके, संजय सब्बनवार, अमोल उत्तलवार, राजू कहिलकर, बिमल शहा, प्रवीण उन्दिरवाड़े,यांनी सहकार्य केले.