दवलामेटीत सीएम चषक आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे दवलामेटी परिसरात एवढया मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत असल्याने नागरिक व खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .परिसरातील युवा खळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा क्रीडाक्षेत्रात विकास व्हावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम सीएम चषकामुळे होत असल्याचे मत दवलामेटी ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन रामेकर यांनी व्यक्त केले .
दवलामेटी येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्स मैदानावर बुधवार १२ डिसेंबर ते शुक्रवार १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० पर्यत आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी ते उदघाटन प्रसंगी बोलत होते .या स्पर्धेत एकूण ८० संघानी भाग घेतला होता .उदघाटन सामना हिलटॉप रेंजरस आणि सातगाव बुटीबोरी यांच्यात झाला . त्यामध्ये हिल टॉप रेंजरस हा संघ विजयी ठरला. आमदार समीर मेघे यांनी समारोपीय सामन्याच्या वेळी उपस्थित राहून खेळाडूचे अभिनंदन केले .यावेळी आदर्श पटले , केशव बांदरे,विजय गंथाळे , महेश लोखंडे ,संजय कपनीचोर, विशाल कुंभरे, नितीन अडसड, प्रशांत केवटे, सुनील शेट्टी, सतीश खोब्रागडे, राजेश चांदेकर, रमेश गोमासे, सुनील अदोलकर, प्रतीक पारधी, सचिन खिल्लारे, राज शेंडे ,संजय जावरकर, विलास लुटे, कार्तिक पारधी, सुशांत धुळे, चंदन पाटील, अजय जैस्वाल, रवि खैरकर प्रामुख्याने उपस्थित होते .