विश्वकल्याणक येथे अनोखा प्रयोग

लिटरभर पाण्याने रोपट्यांना मिळतय जीवदान  : विजय चांडक

खबरबात , धुळे/ गणेश जैन
बळसाणे  :  साक्री तालुक्यातील बळसाणे येथील विश्वकल्याणक या तीर्थावर पदधिकारयांनी मोठ्या प्रमाणावर विश्वकल्याणक परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपटे लावली परंतु यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने साक्री तालुक्यातील बळसाणेसह माळमाथा परिसरात पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत दरम्यान विहिरीत व बोअरवेल ला थोडेफार पाणी असून त्या तीन हजार लहान रोपट्यांना रोज पाणी घालणे अवघड होत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून बोलले जात होते
  गोंदूर येथील चांडक फाँर्म हाऊसचे संचालक विजय चांडक हे सोमवार रोजी विश्वकल्याणक येथे दर्शनासाठी आले असता स्थानिक कर्मचारी एक एक झाडांना बकेटद्वारे पाणी घालत होते दोन तीन झाडांना पाणी घालणे ठिक होते परंतु तीन हजार झाडांना पाणी घालणे म्हणजे एका प्रकारे अवघडच होते चांडक यांनी सदर द्रुश्य पाहिल्यावर त्यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्टगणांना मोलाचा सल्ला दिला एक लिटराची कुठल्याही कंपनीची खाली पाण्याची बाटली भरून त्या बाटलीत सुतळीची वात तयार केली आणि अशोका च्या लहानश्या झाडाला लहान दगडाच्या वरती भरलेली एक लिटराची पाण्याची बाटली ठेवून त्या बाटलीचे पाणी एक एक थेंब मातीत मुरत होते झाडाच्या जागेवर ओलावा तयार झाला आणि ते पाणी झाडाच्या मुळापर्यंत गेल्यावर ठेवलेली पाण्याची बाटली तीन दिवसापर्यंत खाली होत नसल्याचे म्हणाले तीन दिवस पर्यंत रोपट्याला पाणी पोहचल्यामुळे आठ दिवसापर्यंत त्या रोपट्याला पाणी नाही घातले तरी चालते चांडक यांनी एका झाडावर प्रयोग करून यशस्वी केला फक्त तुम्ही जेवढे रोपटे तेवढ्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या घ्या आणि प्रत्येक रोपट्याजवळ पाण्याने भरलेल्या बाटल्या ठेवा तीन दिवसापर्यंत रोपट्यांना पाणी पुरेल आणि आठ दिवस पाणी घालू नका त्याचप्रमाणे रोपटे ही जिवंत राहील व कर्मचाऱ्यांचा वेळही वाचेल व पाण्याची बचत होईल असे विजय चांडक यांनी सांगितले त्याच दिवशी कमलेश गांधी यांनी दोनशे रोपट्या जवळ पाण्याची बाटली ठेवून व अनोखा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान विश्वकल्याणकाच्या पदधिकारयांना झाले तसेच त्याच्या प्रयोगाची दिवसभर चर्चा होत होती  यावेळी भागचंद कोचर ,  कमलेश गांधी , विजय राठोड , सुरेंद्र भंसाली , पारस कवाड , महावीर कोचर , गणेश कोचर , दिपक जैन , रमेश कोचर व जैताण्याचे उपसरपंच अशोक मुजगे , बाजीराव पगारे , बापू भलकारे , भुरा पेंढारे , गणेश न्याहळदे आदी उपस्थित होते