हेराफेरीप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

मनोज चिचघरे/भंडारा पवनी:
 पवनी तालुक्यातील मौजा मोहरी येथील शेतजमीनच्या रेकॉर्ड मध्ये हेराफेरी करुन त्यात आधारावर बेकायदेशीरपणे विक्रीपत्र केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पवनीचे न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.

 याबाबतचे वृत्त असे की भिमराव  हरी रामटेके व गोपीनाथ रामटेके यांच्या मालकीची शेतजमीन मौजा मोहरी येथे असुन गट क्रमांक १०४,आहे सदरची शेतजमीन वडिलोपार्जित त्यांनी किंवा त्यांच्या आईवडिलांननी कोणत्याही स्वरूपाच्या हस्तांतरनण लेखाद्वारे हि शेतजमीन मोहरी येथील मोरेश्वर लांजेवार यांना विकली नसंताना देखील या शेतीच्या रेकाँडेँमध्ये त्याचे नाव कापून स्वत:चे नावाने सातबारावर नोंद करून त्यात आथारावर दुसर्या व्यक्तीच्या नावाने बेकायदेशीरपने विक्रीपत्र करुन देण्यात आले.
यासंबंनधाने माहिती मिळताच पोलिस स्टेशन पवनी येथे फिर्यादी 
भिमराव रामटेके , मुक्का मोहरी यांनी लेखी फिर्यादी देवून देखील पवनी पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न केल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी यांचेकडे कलम ४६८,४७१,४२०,भा ,दं , वि , 
अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली होती,
या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी यांनी पवनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, याप्रकरणी फिर्यादीची बाजु अँड महिंद्र म,गोस्वामी मांडत आहेत,