क्रोनी जिम तुकूम येथे रक्तदान शिबिर संपन्न

चंद्रपूर/अमोल जगताप:

दिनांक 9 दिसंबर 2018 रोजी तुकूम येथील क्रोनी जिम तुकूम येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.हे शिबिर क्रोनी जिम,एच.डी.एफ.सी.बँक व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फॉउंडेशन यांच्या माध्यमातून घेण्यात आले.या भव्य शिबिरमधे एकूण 55 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. 
या कार्यक्रमाला प्रमुख अथिती महानगरपालिका नगरसेवक सुभाष कासनगोटुवार,जि.प.समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे,नगरसेविका शीलाताई चव्हाण,HDFC बँक व्यवस्थापक कुणाल नाकाडे,रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष हकीम हुसैन,सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत राठौड़ साहेब व शासकीय रक्तपेढ़ीचे डॉ.स्वप्नील चांदेकर,योगेश जारोंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात रक्तदान चळवळी बद्दल विस्तृत माहिती दिली.व क्रोनी जिम तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे भरभरुन कौतुक केले.
क्रोनी जिम तर्फे मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. रक्तदान शिबिराचे हे द्वितीय वर्ष असून मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवितात.
याअश्याप्रकारे रक्तदान शिबिर संपन्न झाले.हे शिबिर यशस्वी करण्याकरिता क्रोनी जिम संचालक अभिषेक गोहने,सुरेंद्र वासेकर, प्रशिक्षक निखिल बंसोड़,शुभम गेडाम,राकेश तड़स,कपिल खेडेकर,अनिकेत कातकर,सौरभ पिम्पळशेंडे, तसेच युवकांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन मदन चिवंडे यांनी केले,तर आभार कपिल खेडेकर यांनी मानले