पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न

विशेष सभेला महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित
 चंद्रपूर/प्रतिनिधी:

 पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षाने बुधवारी महानगर पालिके समोर केला.16 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पाणी पाण्याच्या समस्येवर वर विशेष सभा घेण्याचे आश्‍वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले होते. त्यानुसार आज पाणी समस्येवर विशेष सभेचे आयोजन केले असता महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत सभागृहात न पोहोचल्यामुळे पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात आला. पाणीपुरवठा कंत्राटदार योगेश समरित यांना वारंवार बोलावून सुद्धा त्यांनी सभागृहात येण्याचे टाळले.यामुळे सभागृहाचा अवमान होत असल्याची बाब मागील आमसभेमध्ये सभागृहातील नगरसेवकांनी लक्षात आणून दिली.पाणीपुरवठा समस्येवर विशेष सभा घेण्याचे निश्चित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका मागील आमसभेमध्ये नगरसेवक पप्पू देशमुख यांनी घेतली.विरोधकांनी सभागृहातच निषेध करीत सभात्याग केला व सर्व विरोधक महानगरपालिका इमारती समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर एकत्रित झाले.

  यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख,, नगरसेविका मंगला आखरे काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर,अशोक नागपुरे,नगरसेवक दीपक जयस्वाल सुनिता लोढीया,सकीना अन्सारी, विना खनके,अमजद अली,मंगला भोयर,बसपा आघाडीचे प्रदीप डे व पुष्पा मूननिलेश खोब्रागडे, कुशल पुगलिया,देवेन्द्र बेले, उपस्थित होते.