वाडीचा हर्षल सरजारे तालुक्यात दुसरा

नागपूर / अरूण कराळे:

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे ऑगष्ट २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती.यांमध्ये वाडी येथील आटे ले आउट मधील ज्ञान विद्या मंदिराचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी हर्षल अनिल सरजारे हा पात्र ठरला असून नागपूर ग्रामीण तालुक्यातून तो दुसरा आलेला आहे.शाळेतर्फे संचालक अधरचंद्र पांडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी सीता पांडे,रिता आकोटकर,ज्योत्स्ना बडवाईक, राजेश शाहू,दिनेश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 हर्षलनी आपले यशाचे श्रेय आई,वडील व शिक्षकांना दिले . हर्षलच्या या यशाबद्दल नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश फलके , महासचिव अरुण कराळे , कार्याध्यक्ष डॉ . अजय तायवाडे , उपाध्यक्ष समाधान चौरपगार , जिल्हा प्रतिनिधी गजानन डोंगरे ,प्रसिद्धी प्रमुख दिलीप ठाकरे , सदस्य संजय खांडेकर , सदस्य सौरभ पाटील , जितेंद्र उके, नटवर अबोटी , राहूल शेंडे , गजानन तुमडाम आदींनी अभिनंदन केले .