सात कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर

नागपूर/प्रतिनिधी:
nagpur university college साठी इमेज परिणाम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नीत सात कॉलेजेसनी स्वत:हून कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.एकही शिक्षक अथवा विद्यार्थी नसणाऱ्या सुमारे ५८ कॉलेजेसना नागपूर विद्यापीठाने कायमचे बंद केले होते. त्या कॉलेजेसकडून संलग्नीकरण नूतनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामळे विद्यापीठानेच कारवाई करून कॉलेज बंद केलेत.  त्यात उमरेड येथील केडीके कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि नागपुरातील राजश्री मुळक वीमेन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अशा दोन प्रमुख कॉलेजेसचा समावेश आहे.
विद्वत परिषदेत सादर केलेल्या प्रस्तावानुसार, वैनगंगा इन्स्टिट्युट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज, शिक्षण कॉलेज काटोल, ओम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग वर्धा, आचार्य विनोबा भावे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पवनार, केडीके कॉलेज उमरेड, राजश्री मुळक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वीमेन आणि विद्यानिकेतन इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी या कॉलेजेसनी शैक्षणिक सत्र २०१९-२०१० पासून कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

एकही शिक्षक अथवा विद्यार्थी नसणाऱ्या सुमारे ५८ कॉलेजेसना नागपूर विद्यापीठाने कायमचे बंद केले होते. त्या कॉलेजेसकडून संलग्नीकरण नूतनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामळे विद्यापीठानेच कारवाई करून कॉलेज बंद केलेत. परंतु, आता काही संस्थांनी त्यांची कॉलेजेस बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाला सादर केले आहेत. त्यावर येत्या मंगळवारी होणाऱ्या विद्वत परिषदेत चर्चा होणार आहे.यात इंजिनीअरिंग फॅकल्टीतील ६ कॉलेजेस आहेत.या कॉलेजेसच्या बंद होण्याने प्राध्यापकांवर मात्र कुऱ्हाड कोसळणार आहे. काही प्राध्यापकांची संस्थेच्या इतर कॉलेजेसमध्ये बदली करण्यात आली आहे.