नागपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

नागपूर / अरूण कराळे:

विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी ,तसेच प्रत्यक्ष खेळाच्या माध्यमातुन त्यांना विज्ञानाचे रहस्य उलगडता येते दैनंदिन जीवनात घडत असलेल्या बदलाची माहिती मिळावी हाच उद्देश विज्ञान प्रदर्शनशीचा असतो . प्रदर्शनीमधून विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासूवृत्ती निर्माण होते , शेतकरी सुध्दा विज्ञानाच्या माध्यमातुन शेतात नवनवीन प्रयोग करतात . खेळीमेळीतुनच विज्ञानाचे धडे मिळतात असे प्रतिपादन नागपूर पंचायत समीतीच्या सभापती नम्रता राऊत यांनी केले .
नागपूर तालुक्यातील गोधणी ( रेल्वे ) येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शुक्रवार ११ जानेवारी व शनिवार १२ जानेवारी रोजी दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या .उदघाटन गटविकास अधिकारी किरण कोवे यांनी केले . प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ .मिनी देशमुख, सरपंच दिपक राऊत , शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर, गुलाब उमाठे, रामराव मडावी , पंचायत विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, डॉ .अमन टेंभुर्णे , प्रा . भारती निस्ताने , डॉ . शारदा रोशनखेडे , राहूल शिरपूरे , देशमुख , शहानवाज आलम ,प्रीती बढीये, प्रामुख्याने उपस्थित होते . तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळामधील विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घेतला . विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व मान्यता प्राप्त खाजगी उच्च प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन केल्याचे प्रास्ताविकतेमधून गट शिक्षणाधिकारी सुभाष जाधव यांनी सांगीतले . संचालन डॉ . सुर्वंणा जांभुळकर व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी यांनी केले . यावेळी केंद्र प्रमुख शरद भांडारकर , हेमचंद्र भानारकर ,रेखा कडु , प्रेमा दिघोरे, सीमा फेंडर उपस्थित होते . विज्ञान प्रदर्शनीला तालुक्यातील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .