वाडीत सापडला युवकाचा मृतदेह

वाडी(नागपूर )/अरूण कराळे 
मृतदेह साठी इमेज परिणाम
येथील संत ज्ञानेश्वर ले आउट येथील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या ट्रांन्सपोर्टच्या छतावर तरुणांचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .प्राप्त माहितीनुसार मृतक संजय उर्फ चांड्री रत्तीराम धारणे वय३० हा अमरावती महामार्गावरील एम एन चिकन सेंटर मध्ये मजुरीचे काम करायचा.
परंतु तो दारूच्या व्यसनाधीन झाल्यामुळे दिवसभर मजुरीचे काम करून रात्री त्याचे राहण्याचे ठिकाण स्थिर नव्हते त्यामुळे जिथे कुठे जागा मिळेल तिथे झोपायचा. बुधवार ६ जानेवारी रोजी त्याचा मृतदेह ट्रांन्सपोर्टच्या छतावर आढळला.मृतकाची बहीण फूलमती महाजन ही दाभा येथे राहत असून पोलिसांनी तिला घटनेची माहिती दिली असता माझा व त्याचा काहीही संबंध नसून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास तिने नकार दिला. घटनेचे तपास कार्यवाहक वरिष्ठ पो.निरीक्षक अनिल टाकसांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पो.निरीक्षक शामराव कावनापूरे,हेडकॉन्स्टेबल विनोद बूके करीत आहे.