गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

अनिल पवार/उमरेड:

गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात.यानिमित्ताने आज चांपा ग्रामपंचायत द्वारा आयोजित हळदीकुंकू समारंभ या दिवसांतच साजरे करण्याचे महत्त्व आहेत तसेच आज चांपा येथे आज हळदी कुंकू व महिला मिळावा यानिमित्ताने वाण वाटप कार्यक्रम करण्यात आला .
ग्रामपंचायत भवन च्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला .संपुर्ण ग्रामपंचायत भवन व पटांगण महिलांनी खचाखच भरून गेले होते .यावेळी चांपा येथिल महिलांनी हळदी कुंकू च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .सावित्री बाई फुले यांच्या फोटो ला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा मा .निशाताई सावरकर यांचे सरपंच अतीश पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपसरपंच अर्चना सिरसाम यांच्या हस्ते हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले .

जिल्हापरिषद अध्यक्षा मा .सौ निशाताई सावरकर यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेण्यात आला .यावेळी महिलांना मार्गदर्शन करतेवेळी महिलांच्या विकास व आर्थिक द्रुष्टीने सबलीकरण करावा व महिला बचत गट मार्फत विविध योजनांचा लाभ बचत गट व तनिष्का गट च्या माध्यमातून गावाचा विकास करावा असे या विषयी महिलांना च्या सबलीकरण च्या संबंधित मार्गदर्शन केले .

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा .सुषमाताई सावरकर तनिष्का व्यासपीठ समन्वयक दै. सकाळ उपस्थित होत्या .व कुही पोलिस उपनिरीक्षक मा .प्रमोद राऊत व सकाळ चे विदर्भ सहयोगी संपादक मा प्रमोद काळबांडे , तनिष्का सकाळ चे अतुल मेहरे , प.स क्रुषि अधिकारी मा नागरकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या सबलीकरण व आर्थिक द्रुष्टीने मार्गदर्शन करण्यात आले .

कार्यक्रमाचे आयोजक मा .सरपंच अतीश पवार यांच्या मार्गदर्शनात हळदी कुंकु व महिला मेळावा आयोजित करण्यात आला , नवनिर्वाचित सरपंच यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम पहिल्यांदाच चांपा ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला .यावेळी सकाळ च्या समूहासोबतच तनिष्का व्यासपीठ अंतर्गत प्रोजेक्टवर महिलांना तनिष्का विषयी वीडियो क्लिप द्वारे महिलांना आर्थिक द्रुष्टीने व महिलांना सबलीकरण करण्याच्या द्रुष्टीने चांपा येथिल नवनिर्वाचित मा सरपंच अतीश पवार यांच्या महिलां संबंधित हळदी कुंकू व महिला मेळावा हा उपक्रम पहिल्यांदाच चांपा ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला.