व्याजासाठी सावकाराने कुटुंबाला पेटविले
  चंद्रपूर :
व्याजाने घेतलेल्या रक्कमेच्या वादातून अवैध सावकाराने माय-लेकावर पेटड्ढोल टाकून त्यांच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना स्थानिक सरकारनगर भागात घडली आहे. या घटनेत मायलेक गंभीर जखमी झाले असून युवकासह आरोपीही जखमी झाला आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सदर घटना सोमवारी दुपारी दीड वाजता घडली.
सरकारनगर येथील पीयूष हरीणखेडे या युवकाने जसबिरसिंग भाटीया या अवैध सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. पण व्याज नियमित मिळत नसल्याने सावकाराने सदर युवकाचे घर गाठले. यावेळी युवकाने रात्री आठ वाजेपर्यत रक्कम देण्याचे मान्य केले. मात्र मला आताच पैसे पाहिजे असा दमच या सावकाराने भरला. तेव्हा अवैध सावकाराने त्याच्या वाहनातून दोन पेटड्ढोल भरलेल्या बाटल्या आणून सदर युवका व त्याची आई कल्पना यांच्या अंगावर ओतले आणि आग लावली. युवक २५ टक्के तर त्याची आई ६० टक्के भाजली आहे. तसेच घरही काही प्रमाणात जळाले. मुलाचे वडील रघुनाथ हरिणखेडे हेही आगीत १५ टक्के भाजल्या गेले. आरोपी जसबिरसिंग भाटीया याचेही हात भाजले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तपासचक्र वेगाने फिरली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.