पोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू


दिनचर्या /चंद्रपूर :

चंद्रपूर शहरातील आकर्षित व नवीनच बनलेल्या गिरणार चौक येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.ही घटना आज दिनांक 30 जानेवारी ला सकाळी 8च्या सुमारास घडली असून गौरी बद्दलवार असे या मृत मुलीचे नाव आहे.सदर इमारतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी गॅलरीतल्या कटघर समोर उभी होती. कटघराची उंची कमी असल्याने अचानक तिचा तोल जाऊन खाली पडली.अचानक मोठा आवाज झाल्याने वसाहतीतील व समोरील रस्त्यावरील प्रवास्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता गौरी रक्तबंबाळ स्थिती पडून होती.त्यानंतर तिला लगेच शहरातील मेहरा हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


मुलीचे वडील चंद्रपूर पोलिसात असल्याची माहिती आहे मुलगी ही शहरातील FES गर्ल्स स्कूल येथे शिक्षण घेत होती.