कोळशाच्या ओव्हरलोड आणि नियमबाह्य गाड्यावर आरटीओनी कारवाई करावी!


 

कोळशाच्या ओव्हरलोड आणि नियमबाह्य गाड्यावर आरटीओनी कारवाई करावी!

 वेकोलिच्या वे ब्रिज वरून ओवरलोड  गाड्यांकडे अंदेखी
चंद्रपूर :- चंद्रपुर घुगुस मार्गावरील नागाळा येथे असलेल्या  कोळशाच्या 26 गाड्या ओवरलोड आणि नियमबाह्य असल्याच्या कारणाने( एलसीबी)  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करण्यात आल्या.  वेकोलिच्या पवणी व गोवरी  या कोळसा खाणीतून कंपनीच्या नावाने निघालेला कोळसा नागपूर, औरंगाबाद,  राजुर वनी,  जालना, भंडारा या ठिकाणी जाण्याऐवजी  हा कोळसा चंद्रपूर जवळी घुगुस मार्गावरील नागाळा गावाच्या   अवैद्य  टालवर  पोहोचविला जात होता.  वेकोलिच्या  वे-ब्रिज वरून काटा करून  10 चक्का गाडीमध्ये 19  टन कोळसा भरण्याऐवजी 26 टन कोळसा भरल्या जात आहे. आणि 12 चक्का गाडीमध्ये 25 टन कोळसा भरण्याऐवजी 32 टन कोळसा भरून सर्रास चोरी केली जात आहे. यातील अधिकाधिक ट्रकांची कागदपत्रे कालबाह्य झाले आहेत. या नंतर सुद्धा वेकोलिने या गाड्याची साधी चौकशी न करता या गाड्या ओव्हरलोड भरून वे-ब्रिज वरून काटा करून काढल्या जात आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या सर्व अनधिकृत गाड्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.