जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांना अवैघ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांना अवैघ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
  चिमूर - :
             चिमूर बस आगारासमोर अवैध चंद्रपूर नागपूर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ची वाहतूक होत असून 200 मीटरच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने या कडे संबंधित पोलीस प्रशासन चे दुर्लक्ष असल्याने वाढती वाहतूक मुळे बस महामंडळाचे नुकसान होत आहे या कडे संबंधित प्रशासन ने दखल घेऊन ट्रॅव्हल्स वाहतूक 200 मीटर नंतरच थांबा देऊन अन्यथा कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांना दि 3/2/2020 ला *माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री धरमसिंह वर्मा उपतालूका प्रमूख श्री देविदास गिरडे कामगार सेना तालुका प्रमुख श्री मत्ते सचिव अनिल खोपे उपाध्यस श्री राजू भाऊ पोटे* यांनी निवेदन दिले
    चिमूर बस आगार व तहसील कार्यालय  समोर अवैध ट्रॅव्हल्स ,छोटी गाडी यांची वाहतूक होत आहे ही वाहतूक चंद्रपूर नागपूर मार्गावर धावत आहे ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या ठेवून प्रवासी भरत असतात तेव्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असते रस्तावरून वाहतूक वर्दळ असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच मार्गावरून विद्यालय,महाविद्यालय तर कान्व्हेंट चे विद्यार्थी जात येत असतात तर तहसील व उपविभागीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते तेव्हा वाहने मधेच उभे ठेवले जातात शासन निर्णय नुसार 200 मीटर चा बस डेपो पासून असताना अगदी लगत ट्रॅव्हल्स का प्रवासी भरण्यासाठी उभी ठेवतात शासन निर्णयाची अवहेलना होत असून पायमल्ली होत आहे तेव्हा पोलीस प्रशासन व आर टी ओ या प्रशासकीय कार्यालयाने दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी *माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री धरमसिंह वर्मा उपतालूका प्रमूख श्री देविदास गिरडे कामगार सेना तालुका प्रमुख श्री मत्ते सचिव अनिल खोपे उपाध्यस श्री राजू भाऊ पोटे, शिवसेनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.