कोळसा चोरी प्रकरणात खनिकर्म विभाग गाढ झोपेत!पोलिसांवर मात्र अतिरिक्त ताण!
चंद्रपूर :
जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. पोलिसांवर "शांतता व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. जिल्ह्यात इतर गुन्ह्यावर नियंत्रित आणण्याचे कार्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेवर आहे. जिल्ह्यात कोळसा तस्करी नविन नाही. काही स्थानिक नेते व कोळसा चोर यांच्या समन्वयातून चालणार हा व्यवहार आहे. जिल्ह्यात तस्करीच्या प्रकरण सुरू आहेत. हे कोळसा चोरीचे प्रकरण जिल्ह्यात नवीन नाहीत, यापूर्वीही अनेक कोळसा चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले, शेवट मात्र काहीच हाती लागत नाही. परंतु आत्ताच्या कोळसा चोरी मुळे स्थानिक गुन्हे शाखेवर अतिरिक्त ताण आला हे मात्र नक्की!
सविस्तर वृत्त असे की, कोळसा प्रकरणातील तपास खनिकर्म विभाग व महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे ही कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मात्र ते स्वतः काहीही न करता व तपासात सहकार्य न करता पोलिसांवर जबाबदारी सोपवून आपण मात्र नामधारि पदाधिकारी असल्याचे दिसत आहे.
चंद्रपुरात रोज लाखो रुपयाची दारू व दारू तस्करावर कर्तव्यदक्ष पोलिस विभाग इमानेइतबारे कारवाई करीत आहेत. तर करोडो रुपयाचा महसूल कोळसा चोरीतून डुबत आहे. सबसिडीच्या कोळशावर कोळसा चोर मालामाल झाले आहे. तरीसुद्धा खनिकर्म विभाग निद्रावस्थेत कसा? हा संशोधनाचा विषय आहे. केंद्रीय कोळसा मंत्री यांनी जिल्ह्यातील याच विभागाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कळक कारवाई करावी.
महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन कडून राज्यातील छोट्या उद्योगासाठी सबसिडीवर देण्यात येत असलेल्या कोळशाची चोर बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर आणि नागपुरातील कोळसा व्यापाराचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. पण गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाला मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुर घुगुस मार्गावरील नागाळा येथील एसएसवे- ब्रिजच्या कोळसा टालावर धाड टाकून पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे कोळसा व्यापारामध्ये चांगलीच खळबळ माजली. कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात आहे. राज्यातील छोट्या उद्योगांना अल्पदरात कोळसा उपलब्ध करून दिला जातो. कोळसा उपलब्ध करून देण्याची शासनाची योजना आहे. नागपूर येथील महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन कडून राज्यातील 250 उद्योगांना सबसिडीवर कोळसा उपलब्ध करून दिला जातो. मात्र यातील काही नाम मात्र उद्योग सुरू आहेत. बाकी कोळसा सबसिडीच्या नावावर चोर मार्केटमध्ये विकल्या जात असल्याचे निष्पन्न होत आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघालेला कोळसा संबंधित उद्योगांना जाणे महत्वाचे आहे. मात्र, यात तसे न होता. कोळसा खाणीतून निघालेला कोळसा ज्या उद्योगांना पाठविला जात होता त्यामध्ये न जाता तो सरळ चोर मार्केटमध्ये विकल्या जात आहे.
कोळसा खाणीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरात मोठा प्रमाणात कोळसा तस्करी नेहमीच होत असते. या चोरीच्या व्यवसायातून या भागात कोल माफिया तयार झाले आहेत.
वेकोलिच्या पवनी व गोवरी, सास्ती या कोळसा खाणीतून कंपनीच्या नावाने निघालेला कोळसा नागपूर, औरंगाबाद, भंडारा ,वणी राजुर,जालना, या ठिकाणी जाण्याऐवजी चंद्रपूर जवळील घुग्घुस मार्गावरील नागाळा गावा जवळच्या कोलस्टाॅलवर पोहोचत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 ट्रक जप्त करण्यात आली. पोलिसांना हा कोळसा नेमका कुणाचा आहे, याचा शोध घेत असून आता या कोळशाच्या तपासासाठी पोलिसांचे सहा पथक रवाना करण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र संशयित कोळसा तस्कर तीन दिवसापासून फरार दाखवल्या जात आहेत. मात्र आपल्या कर्तव्य वर पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मागे लागली आहे. या प्रकरणात यावर कारवाई होते, ती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. जिल्ह्यातील कोळसा चोरीच्या तपासात खनिकर्म विभाग व एम.एस.एम. विभागाची वरिष्ठ स्तरावर उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.