चंद्रपूरचे महाकाली मंदिर कोरोनाग्रस्तांसाठी आले पुढे
Ø धार्मिक संस्था, दानशूर व्यक्ती व संस्थांकडून जिल्हा व मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
Ø जिल्हा प्रशासनाकडून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन
Ø वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे 25 लाखाची मदत
चंद्रपूर, दि.7 एप्रिल : महाराष्ट्र,तेलंगना व मध्यप्रदेशातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रपूर येथील गोंडकालीन ऐतिहासिक महाकाली मंदिराने आपल्या परंपरागत यात्रा महोत्सव रद्द केल्यानंतर आता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. या संस्थांनी जिल्हा सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सढळ हस्ते मदत केली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अनेक धार्मिक संस्था दानशूर व्यक्ती व खाजगी संस्थांनी मोठ्या प्रमाणात मदतीला सुरुवात केली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आवश्यक आहे. त्यामुळेच दानशूर व्यक्ती व संस्थांनी समोर येऊन आपले योगदान द्यावे ,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .मुख्यमंत्री सहायता निधी प्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी जिल्हा सहाय्यता कोष निर्माण करण्यात आला आहे.
अनेक दानशूर व्यक्ती स्वतःहून यासाठी पुढे येत असून आतापर्यंत अनेकांनी याठिकाणी धनादेश व रोख रक्कम देऊन मदत केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आजच्या काळात मदत करणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेल्या वेगळ्या कक्षात मदत द्यावी व केवळ दोन व्यक्तीने येऊन द्यावी अशी विनंती केली आहे.
आज प्रामुख्याने महाकाली देवस्थान 2 लाख 11 हजार, वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड कडून रुपये 25लक्ष, जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर कडून 51 हजार रुपये , सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक चंद्रपूर शाखेकडून रुपये 1 लाख,धनोजे कुणबी समाज मंदिर तर्फे 1 लाख 11 हजार, महापौर राखी कंचलावार, रुपये 1 लाख, मिलिंदकुमार भरणे (सिपेट) रुपये 3 लाख, माजी खासदार नरेश पुगलिया रुपये 2 लाख, बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्ट तर्फे 2 लक्ष रुपये, अंबादेवी देवस्थान वरोरा तर्फे १ लाख, व्यंकटेश्वरा टेम्पल ट्रस्ट मार्फत रुपये १ लक्ष, आनंद नागरी सहकारी बँक लिमि. तर्फे 1 लक्ष रुपये, पारस कांबळे,( ऊर्जा सोशल अंड कल्चरल फाउंडेशन) तर्फे रुपये 31 हजार कलेक्टर चंद्रपूर कोविड-19 या बँक खात्यात देणगीदार व संस्थाकडून जमा करण्यात आले.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र खात्यामध्ये मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे 2 लाख 11 हजार 863, हाहा हर्षल ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे रुपये 50 हजार, कॅलिबर मेरकँटिले प्रा. लिमि. मार्फत रुपये 3लक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर चंद्रपूर तर्फे 1 लक्ष निरुपा बेंडले रुपये 1 लक्ष देणगी स्वरूपात देण्यात आले.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.