लोहगाव विमानतळ परिसरातील झोपडपट्टीत गरजूंना शंभुसेना व माजी सैनिक आघाडी कडून मदतीचा हात





लोहगाव विमानतळ परिसरातील झोपडपट्टीत गरजूंना शंभुसेना व माजी सैनिक आघाडी कडून मदतीचा हात


पुणे (प्रतिनिधी) : दिनचर्या न्युज :-
दिनांक ०८/०५/२०२० रोजीच्या टप्यात शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने पुणे येथील लोहगाव विमानतळा जवळील बर्माशेल झोपडपट्टीत राहणार्‍या गरजू, गरीब व बेरोजगार कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढ्या किराणा मालाचे साहित्य वाटप करण्यात आले.

यात प्रामुख्याने गव्हाचे पीठ, भाताचे तांदूळ, साखर, खाण्याचे तेल, चहा पत्ती, मिठ पुडा, चना डाळ, मिर्ची पावडर, हळद पावडर, जिरी, मोहरी, मुंग डाळ, तूर डाळ, कपड्यांचा साबण, आंघोळीचा साबण आदी जीवनावश्यक किराणा वस्तूंचा समावेश आहे.

संघटनेचे पदाधिकारी मदत घेऊन झोपडपट्टीत पोहचताच लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व प्रसन्न मुद्रा स्पष्टपणे जाणवत होती, यामुळे वाटप करणाऱ्यांनाही मनोमन खूपच समाधान वाटले. याकामी शंभुसेना प्रमुख श्री. दिपक राजेशिर्के, श्री. सुनिल काळे, महाराष्ट्र प्रदेश माजी सैनिक विकास समिती,
श्री. बाबासाहेब जाधव, श्री. रमेश गायके, श्री. बी. व्ही जाधव, कर्नल ए. एस. ग्रेवाल, कमांडर रविंद्र पाठक, लक्ष्मीकांत राजेशिर्के, आनंद सिंग, हेमा कुमार, सोमकांत हेमा, राजेंद्र मुसळे, मनु नायर, शेखर डोंबे, मनोज मुसळे, संदिप साळूखे, रवी अग्रवाल, सुनिल राणा, भरत मोरे, पद्माकर फड, बाजीराव गायकवाड, बी.व्ही जाधव, दिलीप निंबाळकर, ए. व्ही. बिराजदार, बाबासाहेब जाधव, आनंद ठाकूर, मोहन पाटील आदींसह माजी सैनिक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. पुढील वाटप लवकरच श्रीगोंदा तालुक्यातील गरजूंना किराणा मालाच्या किटचे वाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

दिनचर्या न्युज