परप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेटपरप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेट


गावातीलच विलगीकरण केंद्रातील निवास व्यवस्थेचा आढावा घेत त्यांच्या थर्मल
स्कॅनिंगसह वैद्यकीय तपासणी करुन घेतली.

नागभीड :दिनचर्या न्युज
नागभीड तालुक्यातील अनेक मजुर व युवक हे रोजगारासाठी तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर परप्रांतात तसेच महाराष्ट्रातील ईतर अनेक जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. अशातच देशात आलेल्या कोरोना संकटामुळे २४ मार्च पासुन सर्वत्र लाॅकडाॅउन सुरु झाले. यामुळे स्थलांतरीत नागरिकांना आपल्या स्वगावी येण्यास अडचण निर्माण झाली.
अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे विविध ठिकाणी अडकुन पडलेल्यांनी भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य यांचेशी संपर्क साधला होता. प्रशासन , भाजपा पदाधिकारी व सर्वदुर असलेल्या मित्रमंडळींच्या मदतीने लाॅकडाॅऊन च्या सुरुवातीपासुनच मदतीचा हात पुढे करीत राज्यात व परप्रांतातअडकलेल्यांना आवश्यक जीवनोपयोगी साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी मदत केली आहे . सातत्याने त्यांच्या संपर्कात राहुन जिल्हा व राज्य प्रशासनाने स्वगावी परतण्यासाठी दिलेल्या सुचना , हेल्पलाईन क्रमांक व माहिती देत गेले. भाजपा नेते व माजी मंत्री आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार , भाजपाचे प्रदेश महामंत्री व विधानपरिषद सदस्य आम. डाॅ. रामदासजी आंबटकर व चंद्रपुर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सहकार्याने चंद्रपुर जिल्हा कोरोना आपत्ती निवारण केंद्राच्या माध्यमातुन ठिकठिकाणी अडकलेल्यांना आवश्यक ती मदत तात्काळ पोहचविण्यात मोठी मदत झाली .
दोन दिवसापासुन परप्रांतातील मजुर व युवक आता प्रशासनाच्या सहकार्याने रेल्वे व विविध मार्गाने आपापल्या गावात परतण्यास सुरुवात झाली आहे. आज नागभीड तालुक्यातील अनेक गावात परतलेल्या या मजुरांची व त्यांच्या कुटुंबियांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी भेट घेतली. गावातीलच जि.प.शाळेत विलगीकरण केंद्र सुरु करुन या परतलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी १४ दिवस या सर्वांना या ठिकाणी कोरेंटाॅईन करण्यात आलेले आहे. या निवास व्यवस्थेचा आढावा धेत असतांना अनेकांची वैद्यकीय तपासणी झाली नसल्याचे लक्षात आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनोद मडावी यांचेशी संपर्क साधुन विशेष आरोग्य चमु कडुन या सर्वांची तपासणी करुन थर्मल स्कॅनिंग घेण्यात आली. यावेळी प्रत्येकच गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य , ग्रामसेवक, आरोग्यसेवक , आंगणवाडी सेविका , आशा वर्कर यांचेसह अनेक सामाजिक कार्यकर्तेही त्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे दिसुन आले.
नागभीडचे तहसिलदार मनोहर चव्हाण व पं.स. च्या संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शनात महसुल प्रशासन, पंचायत विभाग , पोलिस प्रशासन , प्रत्येक गावातील समित्या मदतीसाठी कार्यरत असल्यामुळे सर्वच ठिकाणी या मजुरांकडुन समाधान व्यक्त केल्या जात होते. कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण समयी अनोळखी परप्रांतात झालेल्या मदतीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त करीत आलेल्या बरेवाईट अनुभवांची देवाणघेवाणही केली.
       जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या या भेटी प्रसंगी नागभीड तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके , कृउबास चे संचालक धनराज ढोक, भाजयुमोचे तालुका महामंत्री जगदिश सडमाके, छगन कोलते, मनोज कोहाट , विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती.

प्रतीनीधी - दिनचर्या न्युज