सैनिकांचा अवमान करणाऱ्या वेब सिरीज निर्माती एकता कपूर व शोभा कपूर वर गुन्हा दाखल करावा- शंभुसेना,माजी सैनिक आघाडी






सैनिकांचा अवमान करणाऱ्या वेब सिरीज निर्माती एकता कपूर व शोभा कपूर वर गुन्हा दाखल करावा- शंभुसेना,माजी सैनिक आघाडी

दिनचर्या न्युज 
अहमदनगर (प्रतिनिधी): नुकतीच "XXX सिझन- 2" या वेब सिरीजच्या माध्यमातुन भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या फिल्म निर्माण करत रणरागिणी महिलांचा अवमान करणाऱ्या फिल्म निर्माती एकता कपूर सह तिची आई शोभा कपूर विरूध्द शंभुसेना व माजी सैनिक आघाडीच्या वतीने विमानतळ पोलीस स्टेशन विमाननगर, पुणे येथे तक्रार अर्ज दाखल करून संबंधित वादग्रस्त वेब सिरीज तात्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिल्म निर्माती एकता कपूर व तीची आई शोभा कपूर यांनी "XXX सिझन-2"  या वेब सिरीजच्या माध्यमातून सैनिक अधिकारी जेव्हा देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर लढण्यासाठी जातो तेव्हा सैनिक गेल्यानंतर सैनिकांच्या पाठिमागे त्यांची पत्नी बॉयफ्रेंडला घरी बोलावून अनैतिक संबंध स्थापित करते आहे तसेच नंतर सैनिकी गणवेशही फाडल्याचे आक्षेपार्ह दृश्ये दाखविण्यात आलेली आहेत. हा प्रकार म्हणजे देशभक्त सैनिकांच्या भावनेशी व इज्जतीशी खेळ असून आपल्या भारत देशात राजकिय नेत्यांसह अनेक माथेफिरूंनी सैनिकांविरोधी व त्यांच्या महिलांन विषयी वाट्टेल तसे वक्तव्ये केलेली आहेत, अजूनही अशा नालायक मंडळींची कमी दिसत नाही.
 
परंतु आता मात्र सैनिकांच्या बाजूने शंभुसेना संघटना व माजी सैनिक आघाडी भक्कम पणे मैदानात उतरली आहे, त्यावर प्रतिउत्तर म्हणून ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज , शंभुसेना संघटना प्रमुख व माजी सैनिक दिपकजी राजेशिर्के, माजी सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष मा. रामजी कोरके यांच्यासह सुनील काळे, बाबासाहेब जाधव शिवाजी गावडे, मारुतीराव ठाकरे यांनी दिनांक ०५/०६/२०२० रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांना निवेदन देत तक्रार दाखल केली असून पोलिस निरीक्षक मांडगे यांनीही निवेदन गांभीर्याने घेत पुढील रीतसर कार्यवाही साठी माहिती पाठवू अशी ग्वाही दिल्याची माहिती राजेशिर्के यांनी दिली आहे.

प्रसिध्दी व पैशाच्या हव्यासापोटी सैनिकांची बदनामी करणाऱ्या व्हिडीओ वेबसिरीज फिल्मची निर्मिती करून त्यात आपल्या बहिणीप्रमाणे व मातेप्रमाणे असणाऱ्या तसेच सैनिक पत्नीची अगदी खालच्या पातळीवर जाऊन अनैतिक संबंध दाखवत व सैनिकाची वर्दी फाडल्याची दृश्ये दाखविण्याचा नीच पणाचा कळस केला आहे म्हणून संबंधित सैनिकांच्या महिला अवमान प्रकरणावर प्रशासनासह सरकारने योग्यप्रकारे लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या रणरागिणी महिला दोषींच्या तोंडाला काळे फासतील असा इशाराच संघटनेच्या महिलांनी दिला आहे...