मिताली भोयर हिचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने सत्कार
मिताली भोयर हिचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने कु .मिताली हिचा सत्कार दि.२१.७.२०२०
चंद्रपूर ---- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल चंद्रपूर च्या वतीने हिस्लोप ज्यू.कॉलेज मधून 12 वि च्या परीक्षेत 73% गुण मिळाले या बाबत कु.मिताली अविनाश भोयर हिचा रा.का.पा. ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरिकर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. या सत्काराचे वेळी ओबीसी सेल चे महासचिव दिनेश एकवनकर महिला विंगच्या सौ. नंदा शेरकी ,शहर कार्याध्यक्ष माणिक लोणकर,जिल्हा अध्यक्ष पंकज पवार, शहर अध्यक्ष रवी ठाकरे, महेंद्र शेरकी, उमा भोयर, व हार्दिक एकवनकर यांची उपस्थिती होती.