स्वप्नील मासुरकरला बिबटाने केले जख्मी, देवपायली येथील घटना




आला रे आला वाघ आला* 
       
                  देवपायली येथे प्रसाधनगृहात सकाळीच शिरला बिबट..

       स्वप्नील मासुरकरला बिबटाने केले जख्मी
देवपायली येथील घटना 



दिनचर्या न्युज 
               
        नागभीड तालुक्यातील तळोधी ( बाळापुर ) येथून १२ किमी दूर अंतरावर असलेले देवपायली गावात आज २१ आगष्टला सकाळी एकच आरोळी निनादत होती.आला रे आला वाघ आला, गावामध्ये वाघ आला.
  सकाळची वेळ असल्यामुळे काही साखरझोपेत होती.काही प्रात:विधीकरीता बाहेर पडली होती तर काही घरासमोर साफ-सफाई करीत होती. सर्वानी आरोळी ऐकताच वाघाचे दिशेने धाव घेतली. बिबट जातीचा वाघ आरामात वनविभागाचे कार्यालयासमोर आरामात फिरत होता.त्याने संदीप मडावी यांचे घरी कोंबडयावर ताव मारला. गावकरी हळूहळू वाढत होते. गावक-यांनी बिबटाला गावा बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला. पण बिबट गावा बाहेर जाण्याऐवजी गावात शिरला. गावात स्वप्नील चरणदास मासुरकर हा घरासमोर संडास चे सामोरील मोकळया जागेत बकरी बांधत  होता , त्याचेवर हल्ला करून जख्मी केले.व त्याचेच संडासात लपून बसला. याची माहीती वनविभागाला कळताच तळोधी परीक्षेत्राचे क्षेत्र सहायक के.डी.गरमडे यांचे नेतृत्वात वनरक्षक एस.बी.चौधरी व एन.डी पेंदाम व इतर कर्मचारी यानी बिबट पकडण्याकरीता मोहीम राबविली व बिबटाला जेरबंद केले.
         माहिती मिळताच या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी देवपायली ला त्वरेने पोहचुन घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या स्वप्नील मासुरकर ची विचारपुस करुन पुढील उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले. यावेळी बिबटाला बघण्याकरीता परीसरातील बाळापूर; पारडी; सोनूली, बोंड ,तळोधी व नवानगर येथील जनतेनी एकच गर्दी केली होती.वनविभागाकडून जख्मी स्वप्नीलला त्वरीत  अनुदान मिळावे अशी गावक-यांनी व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी मागणी केली आहे.



दिनचर्या न्युज