महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान


महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर कडून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर नाभिक समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्दा गौरव करण्यात आला. देशात सध्या महाभयंकर अशा कोविड 19 ह्या वायरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. काम करण्यासाठी नाभिक समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या परिवाराची व आपली पर्वा न करता. कोरोना रोखण्यासाठी काम करीत आहेत. त्यात नाभिक समाजातील कोरोना योध्दा म्हणून सौ. डॉ. श्रद्धा कमलेश बडवाईक, आरोग्य सेविका(नर्स) सौ. विद्या चौधरी, यांच्यावतीने चेतन इंगळे यांनी सन्मान स्वीकारला. आरोग्य सेविका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सौ. सुनिता किशोर जम्मपलवार,
आरोग्य विभागात काम करणारे प्रशांत कोतपल्‍लीवार, नगर परिषद चे कर्मचारी भारत राजूरकर, श्याम दैवलकर, ग्रामीण आरोग्य विभागत काम करणारे पंजाब चौधरी, मनपाचा घरोघरी जाऊन कुठल्याही परिस्थितीत पर्वा न करता कचरा गोळा करणारी कोरोना योद्धा सौ. कुसुम देवराव जांभुळकर,पोलीस विभागात काम करणारे आपल्या परिवाराची, ऊन वारा ,पावसाची परवा न करता सदैव जनतेच्या सेवेत असणारे पोलीस बांधव  गणेश प्रकाश चौधरी, सतीश वनकर, बालाजी वाटेकर, पोलीस कर्मचारी मुंडे, सतीश टोंगलकर, 


महिला पोलीस कर्मचारी  सौ.  रंजना मांडवकर, सौ. शम्मा राकेश कडुकर,  तसेच समाजात  कीर्तनाच्या माध्यमातून समाज जनजागृती करणारे कीर्तनकार पांडुरंग जुन्नारकर  महाराज, या  सर्व कोरोना योध्दाचा  15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात, ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव बडवाईक यांच्या हस्ते,   मार्गदर्शक दत्तू भाऊ कडूकर,  बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष  श्यामभाऊ राजूरकर,  जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने,  शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार,  प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ.  सरोजताई चांदेकर,  यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत नगाजी महाराज,  श्री संत सेना महाराज,  यांची प्रतिमा,  वृक्ष रोपटे,  पुस्तक देऊन कोरोना योद्धाना  गौरवण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.