जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे अभियानाला सहकार्य करावे - डॉ. राहुल कर्डिले
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
जिल्ह्यातील covid-19 च्या आपत्कालीन कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षापासून राज्यात रुग्ण संख्येत कमी आहे. चंद्रपूर जिल्हा हा दुसरा नंबर कुष्ठरुग्ण संख्या
वर आहे. दहा हजाराच्या मागे तीन रुग्ण अशी संख्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्हा नंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. या भागात धान अनुत्पादक भाग जास्त असल्यामुळे कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे. .सध्या जिल्ह्यातील 2378 क्षय रुग्णांवर उपचार सुरु आहे. हा रोग संसर्गजन्य रोग असून रुग्णाच्या थुंकी पासून याचा आजार पसरत असतो.
जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर साजरा केला जातो. जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की, गृह भेटीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे आणि क्षयरोग व कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी. या रोगाचे लवकरात लवकर निदान औषधोपचार करून संसर्गाची साखळी खंडित करावी. यासाठी जिल्ह्यात 14 दिवसाचे संवैक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वेक्षणात आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत केली जाणार आहे. संशयित रुग्ण शोधण्यासाठी रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्यास, उदाहरणार्थ दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप, थुंकी वाटे रक्त येणे, वजनात लक्षणीय घट, मानेवरील गाठ या लक्षणाचे रुग्ण आढळल्यास यांची थुंकी व किराणा तपासणी करण्यात येणार आहेआहे. अशी माहिती आज जिल्हा परिषद कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर निवृत्ती राठोड सी एस, डॉक्टर संदीप गेडाम, डॉक्टर राजकुमार गहलोत डीएचओ, डॉक्टर प्रकाश साठे डिटीओ, यांची उपस्थिती होती.
.