कवडू खोबरकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड !




कवडू खोबरकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र नाभिक महामंडळचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात मा. कवडूजी खोबरकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाभिक समाजातील ज्येष्ठ समाजसेवक मा. मुरलीधर चौधरी यांच्या हस्ते आज नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच बाराबलूतेदार महा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर, तसेच कार्यकारी सदस्य राजूभाऊ कोंडस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.