राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "आरोग्यम धनसंपदा" अभियान





राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "आरोग्यम धनसंपदा अभियान "

मोफत आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सौजन्याने चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध रोगांची तपासणी शिबिर
जिल्हा सामान्यगणालयात डॉ.निवृत्ती राठोड,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,ज्येष्ठ नेते श्री हिराचंद बोरकुटे,शहर महिला अध्यक्षा सौ ज्योती रंगारी,महापालिकेचे गटनेते श्री दीपक जयस्वाल,राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील,डॉ अमित ढवस,डॉ.सावलीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले, या शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या सहकर्यांनी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या पुढाकाराने डॉ.अमित ढवस,डॉ.सावलिकर व इतर तज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले,या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली,आजच्या शिबिरात*
*१) कॅन्सरच्या ४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात ३ रुग्ण कॅन्सरचे संशयास्पद आढळले,*
*२) डायबेटिज(शुगर) व उच्च रक्त दाब( BP)च्या १०१ रुग्णांची तपासणी झाली,त्यात ९ BP चे व १२ शुगरचे रुग्ण आढळून आले.*
*३)नेत्र चिकित्सा - ४० रुग्णांची करण्यात आली.*
*४) नाक,कान,घसा तपासणी एकूण ७५ रुग्ण तपासले*
*५)मानसिक विकाराचे ३२ रुग्णांची तपासणी झाली.*
*आजच्या शिबिरात एकूण २५२ रुग्णांची तपासणी झाली त्यात १५७ महिला व १३५ पुरुषांनी तपासणी केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हासचिव लता जांभूळ कर जिल्हासरचिटणीस दयाबाई गोवर्धन सरस्वती गावंडे प्रमिला पाठक सोनाली चंडूके.महानंदा वाडके सहकार्य केले.

दिनचर्या न्युज