शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : उपमहापौर राहुल पावडे chandrapur






शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : उपमहापौर राहुल पावडे

नगिनाबाग प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच विकासावर भर दिला आहे. राजकारण हे समाजकारणाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांचे नेहमीच म्हणणे आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला आहे. त्यामुळेच प्रभागात अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. यापुढेही नगीनाबाग प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नगीना बाग प्रभागात नेहमीच विकास कामे सातत्याने होत आहे व सोबत माझ्या असलेले नगरसेवकांची मला साथ मिळाल्याने नगीना बाग प्रभागात चौफेर विकासाला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
चंद्रपूर मनपा निधी अंर्तगत नगिनाबाग प्रभागात सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन उपमहापौर राहुल पावडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
नगिनाबाग प्रभागात अनेक विकास कामात सदा अग्रेसर असलेले नगरसेवक तथा उपमहापौर राहुल पावडे यांनी यावेळी पुढे बोलताना वार्डातील अनेक विकास कामांना उजाळा दिला. नगीनाबाग प्रभागात नेहमीच निधीची कमी पडू दिला नाही चौफेर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
याप्रसंगी विकासकामाच्या माध्यमातून नविन रस्ते बांधकामाचा शुभारंभ आज 6 सप्टेंबर रोजी करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक प्रशांत चौधरी नगरसेविका सविता कांमळे, नगरसेविका वंदना तिखे, सुरेश हरीरमानी, गौरशेट्टीवार, रवी जोगी, संजय निखारे, प्रविण वाटकर, महेश राऊत, सत्यम गाणार, संदीप सदभैये, मयूर जोगे, पियूष लाकडे, अक्षण शेंडे तसेच महिला गाऊत्रे, इंगोले ताई तसेच प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. वार्डातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनचर्या न्युज