" प्रतिभा" मातीचा सुगंध जाणाऱ्या नेत्या!

" प्रतिभा" मातीचा सुगंध जाणाऱ्या नेत्या!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख ही सर्वसामान्यांना नाही, असे फार बोटावर मोजण्या सारखी व्यक्ती जिल्ह्यात असेल! फार थोड्या काळात कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताई हा जमिनीवरच्या नेत्या म्हणायला हरकत नाही! जशा की, पहिल्या पावसाने जमीन ओली व्हावी, आणि त्या मातीचा सुगंध दरवळावा! तश्या ह्या प्रतिभा चा स्वभाव असून तसाच, प्रत्यय मागील आठवड्यात काही पत्रकारना प्रतिभाताई धानोरकरचा भेटीत आला. प्रतिभाताईच्या नावातच खरी "प्रतिभा "असून याचा प्रत्यक्ष दर्शनी अनुभव आला.
वणी तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील पोर, वडिलांचा राजकीय संबंध हा इतर पक्षाचा असताना. मात्र  लग्नापूर्वीच  बाळूभाऊ धानोरकर  शिवसेना  पक्षात होते. बाळू भाऊंचे वडील शिक्षकी पेशात, राजकीय वारसा नसताना  बाळूभाऊ धानोरकर यांनी शिवसेना या पक्षात राहून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.  आता काँग्रेसचे चंद्रपूर- वनी  -आरणी लोकसभा क्षेत्राचे  एकमेव   खासदार आहेत.  मी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून जनतेची सेवा करीत आहे.
धानोरकर कुटुंबात आल्यावर माझ्या सासू-सासर्‍यांनी मुलीसारखी वागणूक दिली.  कसलाही सून म्हणून भेदभाव केला नाही.  संघर्षातून आम्ही पुढे आलो. आमच्यावर फार मोठा प्रसंग आला. माझे बाळ सहा सात वर्षाची असताना त्यांच्यापासून  काहीकाळ दूर राहावे लागले. असे असताना सुद्धा   आम्ही हार मानली नाही!
म्हणून मी साधे, मोकळेपणाने जनतेस  समोर  आली.
  प्रतिभात "प्रतिमा" वाढवण्याची आत्मशक्ती आहे. प्रतिभाताई आता आत्मविश्वासाने सांगतात की, मी कोणत्याही पक्षातून  निवडणूक लढलो तरी  माझा कार्यकर्ता हा तुटणार नाही!
बाबा आमटेनी मला एक मंत्र दिला!, कि बेटा! माणूस कितीही मोठा झाला तरी, जमिनीशी नाते तोडता कामा नये!  कामासाठी  येणाऱ्यांचे समाधान हेच लोक प्रतिनिधीची जबाबदारी ओळखून सर्वांना वेळ देऊन त्यांच्यांशी हितगुंज  साधतात.  रोज शेकडो लोकांशी  संवाद   होत असते. असाच प्रसंग काही दिवसा आगोदर प्रतिभाताई धानोरकर खाली गोठ्यावर बसून चहा पीत बसल्या, त्यांनी प्रकृती खराब असलेल्या महिलेला खुर्ची दिली असल्याचा  व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजला. आणि प्रतिभाताईची प्रतिमा पुन्हा वाढली. हा फोटो कोणी काढला याची थोडीशी कल्पना प्रतिभाताईंना नव्हती असे ते आवर्जून सांगतात.
गर्दीतही आम्ही पत्रकार आहोत याची ओळख नसताना फक्त नजर पडताच   इशारा करून, या बसा! अशा खुणा करून बसण्यास सांगितले! पहिले बसलेल्या व्यक्तींना आस्थेने विचारपूस करून त्यांना तुमच्या क्षेत्रातील आमदारांना पहिले बेटा व मला भेटले म्हणून त्यांना सांगा. हे काम नक्की होईल. असे आवर्जून सांगितले.   राजुरा क्षेत्रातील  आमदार सुभाष भाऊ धोटे  हे माझ्या वडिलांसारखे असून मला सभागृहात आलेल्या अडचणी आणि कामासंदर्भात वारंवार मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे त्या क्षेत्रातील खासदार निधीतून  दिलेला चार कोटी निधी हा आमदार कोट्यातून वाटायचा आहे. आणि ही त्यांची त्या क्षेत्राचा विकास म्हणून जबाबदारी आमदार सुभाष धोटे यांची आहे. असे सन्मानाने त्यांना सांगितले. नंतर हळूच आमचा परिचय घेऊन कापी  पीत  चर्चा केली.  मी आजही स्वयंपाक, भांडी, कपडे आवर्जून करीत असते. त्यामुळे मला एक पारिवारिक ऊर्जा मिळते.  पदआज आहे उद्या नाही. पण मी कुठल्याही प्रकारचा अभिमान न बाळगता या सर्व गोष्टी  करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पहिल्याच भेटीत  प्रतिभाताईंनी आपल्या जडणघडणीतील विचार प्रतिपादन केले. ते पत्रकारांनाच भावले,   तर मग सामान्यांना का भावणार नाही ,याची चर्चा आम्ही केली. त्या त्या एका शब्दात म्हणाल्या  की, 'चहा पेक्षा किटली गरम'!  अनन! आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरेच मिळाली!