काँग्रेसचे माजी शहरध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला!काँग्रेसचे माजी शहरध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला!


दिनचर्या न्युज

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आझाद बगीचाच्या शौच्छालय, सिटी शाळेच्या मुख्य रस्त्यावर चंद्रपूर शहरातील काँग्रेस पार्टीचे माझी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात इसमाने हाँकी, बॅट , राळ याचा वापर करून जीवघेणा हमला करण्यात आला. या हल्ल्यात तीन हल्लेखोर असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदू नागरकर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला येत असतात.या संधीचा फायदा करून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हमला राजकीय हेतू तून झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. नंदू नागरकर यांना शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले असून पुढील चौकशी शहर पोलीस ठाण्याचे  ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.

  शहरात याठिकाणी काही दिवसापूर्वी बंदुकीच्या फायरिंग झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात अधिकची भर पडली असून  शहरात सुव्यवस्था नावाची  भीती नाहीशी झाली आहे का?.  असा प्रश्न  आता चंद्रपूरकरांचा   जनतेला पडला आहे.  दिवसा होणाऱ्या अज्ञात   हल्ल्यामुळे   पोलीस प्रशासनाची  भीती गुंड प्रवृत्तीला  राहिली नाही.