शेतकऱ्याला दारू पाजून शेतीची बोगस विक्री करणाऱ्या गोविंद तेला सह दलाला वर कारवाई करा




शेतकऱ्याला दारू पाजून शेतीची बोगस विक्री करणाऱ्या गोविंद तेला सह दलाला वर कारवाई करा

पिडीत शेतकरी नरेंद्र थेरे यांचा भाऊ विनोद थेरे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी,

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
वरोरा भद्रावती या परिसरात नशेत गेलेल्या व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची अवैध विक्री पैशांचे लालच देऊन करणारी टोळी सक्रिय असून यामध्ये स्थानिक दलाल यांच्या सोबत संगनमत करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपली जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पशा दरात विक्री करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान सावकार व व्यापारी करीत असल्याने याप्रकरणी प्रशासनाने अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे,

चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोंगरगाव येथील शेतकरी नरेंद्र लटारी थेरे यांनी मला दारू पाजुन अपहरण केले व मला दारूच्या नशेत ठेऊन माझ्या शेतजमिनीची बोगस विक्री केल्याचे सांगितले यावेळी त्याचे भाऊ विनोद थेरे व प्रमोद थेरे यांनी सुद्धा माझ्या भावाचे अपहरण करून बोगस विक्री गोविंद तेला व इतर दलालांनी केल्याचा आरोप केला, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून जमीन घेणाऱ्या गोविंद तेला व दलाल शशिकांत विरुटकर आणि नरेश मांडवकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

नंदोरी गावातील नरेंद्र लटारी थेरे याला दारुची अतोनात सवय असल्याने त्याचे घर संसारात लक्ष नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी नाईलाजास्वत तिचे माहेरी तिचे वडीलांकडे सेलू येथे राहत आहे. दरम्यान नरेंद्र थेरे यांची वडीलोपार्जीत मालकीची शेतजमीन मौजा डोंगरगांव (खडी), ता. भद्रावती, जि. चंद्रपुर येथे भु. क. ७६/२, आराजी १.८९ हे. आर शेतजमीन असुन सदरची शेतजमीन नरेंद्र व विनोद लटारी थेरे यांच्या नावाने सयुक्तपणे दर्ज आहे. यामध्ये शेतजमीनीत नरेंद्र थेरे यांच्या नावाने ०. ९४ हे. आर हिस्सा असुन नरेंद्र ला दारुचे अनोनात व्यसन असल्याने त्याचा फायदा घेऊन गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने नरेंद्र थेरे याला दि. २१/०२/२०२२ रोजी नंदोरी बु. फाटयावरुन वरोरा येथे दारु पिण्यासाठी आणले व त्याचे अपहरण करून त्याला भारत लॉज येथे ठेवले दरम्यान त्याचे एच. डी. एफ. सी. बैंक वरोरा येथे खाते क्र. ५०१००४९१४९२४२१ हे बचत खाते काढले व बैंक पासबुक, ए. टी. एम. व चेकबुक काढून ते शशिकांत विरुटकर यांच्याकडे ठेवले व शंकर अडूर यांनी नरेंद्र थेरे यांचे दारूच्या नशेत असताना फोर व्हीलर गाडीतून फिरवीले. दि. २१/०२/२०२२ रोजी वरोरा येथे विक्री दस्त तयार केला व २३ फेब्रुवारी ला भद्रावती येथे विक्री केली,

गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने दारूच्या नशेत असणाऱ्या नरेंद्र थेरे या शेतकऱ्यांची शेत जमीन हडप ली असल्याने त्यांची पत्नी साधना थेरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन मधे करून त्यांच्यावर सावकारी कायद्यांतर्गत व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी अजुनपर्यत कुणावरही कारवाई केली नसल्याने शेतकरी नरेंद्र थेरे यांचे भाऊ विनोद व प्रमोद थेरे यांनी जर पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही तर प्रशासनाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते.