मृद जलसंधारण विभागातील नागपूर व चंद्रपूरच्या 2अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून अटक





मृद जलसंधारण विभागातील नागपूर व चंद्रपूरच्या 2अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून
अटक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर / नागपूर - कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलाकरीता व उर्वरित रक्कम वितरित करण्याकरिता मृद जलसंधारण विभाग नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. Acb trap
तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्याकडे मृद व जलसंधारण कार्यालय जि. नागपूर व जि. चंद्रपूर येथे कोल्हापूर बंधारा सर्वेक्षणाचे काम होते, काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण विभागात बिले सादर केल्या गेले, पण बिलाची रक्कम काढून देण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वर्ग 1 जिल्हा नागपूर 32 वर्षीय कविजित पाटील, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी वर्ग-१ चे 46 वर्षीय श्रावण शेंडे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर व विभागीय लेखाधिकारी जलसंधारण विभाग चंद्रपूर येथील 35 वर्षीय रोहित गौतम यांनी तक्रारदाराला 81 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. Department of Soil and Water Conservation तडजोडीअंती 50 लाख रुपये देण्याचे ठरले, मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचेशी सम्पर्क साधत तक्रार दिली. Bribe पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सदर प्रकरणाची पडताळणी करीत सापळा रचला असता 50 लाख रुपये स्वीकारताना 46 वर्षीय श्रावण शेंडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी चंद्रपूर यांना 3 मे ला रंगेहात अटक केली.

सदर प्रकरणाची कारवाई सुरू आहे, सदर सापळा कारवाई लाचलुचपत विभाग नागपूरच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सचिन मत्ते, सारंग मिराशी, प्रवीण लाकडे, जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी संतोष पंधरे, विकास सायरे, पो. ना. सारंग बालपांडे, सुशील यादव, म. ना. पो. शि. बबिता कोकर्डे, गिता चौधरी, अस्मितासुशील यादव, म. ना. पो. शि. बबिता कोकर्डे, गिता चौधरी, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, पो. शि. हरीश गांजरे, चा. पो. ना. अमोल भक्ते, सर्व ला.प्र.वि. नागपूर व ना.पो. शि. रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, नरेश नन्नवरे, पो. शि. अमोल सिडाम, म. पो. शि. पुष्पा काचोरे, चा. पो. शि. सतीश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.