पिपरी दीक्षित गावात लोकनेते बाबुरावजी मडावी यांचा पुतळा स्थापन




पिपरी दीक्षित गावात लोकनेते बाबुरावजी मडावी यांचा पुतळा स्थापन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक 08/05/2022 रोजी परधान समाजाच्या वतीन चंद्रपूर जिल्ह्यातील पिपरी दीक्षित गावात लोकनेते बाबुरावजी मडावी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदिवासी सामाजिक नेते व आदिवासी परधान समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश बाबुरावजी मडावी उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ विचारवंत नामदेवजी कन्नाके तर सत्कारमूर्ती म्हणून कपिल तिराणकर व ॲड. संदिप सलामे उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भोला मडावी (राष्ट्रीय कार्याध्यक्ष परधान समाज संघ), प्रब्रह्मानंद मडावी ( जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर आदिवासी परधान समाज संघ तथा साहित्यिक, विचारवंत), कविता मडावी (राजुरा) रघुनाथ तलांडे(अहेरी) मनोहर मेश्राम (आदिलाबाद) नीरज आत्राम (जि. सचिव परधान संघ) ब्रजेश महेशकर, छबन कन्नाके, विलास मडावी, अरविंद मसराम, लक्षमन सोयाम, गेडाम सर, तथा आदी असे संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात ही दिनेश मडावी यांच्या जंगी स्वागताने व नेतृत्वात आदिवासी सांस्कृतिक रॅली काढून कारण्यात आली. पिपरी दीक्षित गावाला वेढा मारून आदिवासी संस्कृतीचे दर्शन दाखविण्यात आले. व रॅलीचा समारोप लोकनेते बाबुरावजी मडावी पुतळा अनावरण ठिकाणी झाला. सल्ला घागरा जय पेरासापेन हया आदिवासी प्रतिकासह लोकनेते बाबुरावजी मडावी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला व तिथेच आदिवासी प्रतीक सप्तरंगी ध्वज उभारण्यात आले होते त्याचे रितसर उद्घाटन दिनेश मडावी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
तिथून प्रबोधन कार्यक्रमाच्या ठिकाणी आजूबाजूच्या 15 गावातील जनसमूदाय 47 डिग्री कडकत्या उन्हात मोठ्या उत्साहाने जमलेला होता तिथे कार्यक्रमांचे सर्व अतिथी पोहचले व प्रबोधन कार्यक्रम पार पडला. त्यात उद्घाटक म्हणून दिनेश मडावी यांनी पिपरी दीक्षित येथील समाज बांधवांचे आभार मानले व कौतुक केले तथा बाबुराव मडावी यांचा आदर्श व वसा असाच पुढें राहो व समाज एक संघ होवून आपले हक्क व अधिकार याच्याबद्दल जागृत व्हावा म्हणूनच परधान समाजाचे नेतृत्व समाजाच्या साक्षीने स्वीकारले असे उदगार काढले व जय घोषासह सर्वांचे अभिनंदन करीत धन्यवाद दिले. तसेच अध्यक्ष म्हणून नामदेव कन्नाके यांनी बाबुराव मडावी यांचा इतिहास व कार्य थोडक्यात मांडले व बाबुराव मडावी तर शहीद झाले पण त्यांचे पुढचे कार्य हे आमचे आहे व ते आम्ही स्वीकारले आहे असे प्रतिपादन करीत त्यांनी सुद्धा पुतळा स्थापन करण्यात आल्या बद्दल ग्राम वासियांना धन्यवाद देत आभार मानले व अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर मडावी, गेडाम भाऊ, रुपचंद मडावी तथा पिपरी दीक्षित येथील परधान समाजाच्या सर्व आदिवासी बांधवांनी अथक मेहनत घेतली.