महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री अजितदादा पवार येत्या 28 व 29 जुलैला करणार चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी !





महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री अजितदादा पवार येत्या 28 व 29 जुलैला करणार चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील १५ दिवसांपासून चंद्रपूर,गडचिरोली,आणि भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी,आणि पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण पिक उध्वस्त झालेलं आहे,अनेक घरांची पडझड झालेली आहे,मी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा.ना.अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.आ.श्री जयंत पाटील यांना या तिन्ही जिल्ह्यांचा आपण दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करून पुरपिडीतांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत विनंती याच महिन्यात १५ जुलैला केली होती,त्याच अनुषंगाने येत्या २८ व २९ जुलै रोजी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मा.श्री अजितदादा पवार हे येत आहेत.या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहरासह काही तालुक्यांमध्ये ते शेतीची आणि गावांची पाहणी करणार आहेत.

दिनचर्या न्युज